अवघ्या 5 महिन्यांत लोणी काळभोर ला मिळाला 6 कोटी 17 लाखांचा निधी

लोणी काळभोर : लोणी काळभोर गावच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून गेल्या पाच महिन्यापूर्वी सरपंच पदावर विराजमान झालेल्या सविता लांडगे यांनी आपल्या कामाचा आलेख उंचावत गावच्या विकासासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून जिल्ह्यातील सर्वाधिक 3 कोटी 57 लाखाचा निधी लोणी काळभोर गावाला मिळविला आहे.  हा निधी पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपलब्ध करून दिला असून ग्राम निधीमधून 2 कोटी 60 लाख असा एकुण 6 कोटी 17 लाखांचा निधी उभारण्यात यश आले आहे.  या निधीमुळे गावच्या विकासात मोठी भर पडली आहे.

यासाठी हवेलीतील जेष्ठ नेते माधव काळभोर, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास काळभोर, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, राष्ट्रीय काँग्रेसचे हवेलीतील जेष्ठ नेते शिवदास काळभोर, सुभाष काळभोर, आण्णासाहेब काळभोर, युगंधर काळभोर, सिताराम लांडगे, सुनंदा शेलार यांचे मार्गदर्शन लाभले. तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे हवेली तालुका अध्यक्ष तसेच जिल्हा नियोजन मंडळाचे दिलीप वाल्हेकर, सदस्य प्रवीण काळभोर, युवराज काळभोर, कमलेश काळभोर, निलेश काळभोर यांनी जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केले असल्याची माहिती  सरपंच सविता लांडगे, उपसरपंच रत्नाबाई वाळके यांनी दिली.

जिल्हा नियोजन मंडळाकडून मिळालेल्या निधीमधून खालील कामे मंजूर करण्यात आली आहेत.
१) तरवडी ते रानमळा रस्ता करणे १०.५० लक्ष
२) लक्ष्मण काळभोर घर ते लष्कर घर कॉक्रीटीकरण करणे १०.५० लक्ष
३) लोणी काळभोर उत्तमनगर ते सईद आगा घर रस्ता करणे १०.५० लक्ष
४ ) जुना सोलापूर रोड ते पाषाणकर बाग ते भूजभळ घर रस्ता करणे १०.५० लक्ष
५) लोणी काळभोर खोकलाईदेवी मंदिर ते घुमेचाळ रस्ता करणे १०.५० लक्ष
६) लोणी काळभोर गावठाण अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण करणे २० लक्ष
७) लोणी काळभोर महादेव मंदिर ते पालखी तळ रस्ता करणे २० लक्ष
८) लोणी काळभोर बाजारमळा अंतर्गत रस्ता करणे २० लक्ष
९) सोलापूर रोड ते हनुमंत वाघले घर कॉक्रीटीकरण करणे २० लक्ष
१०) लोणी काळभोर माळीमळा अंतर्गत रस्ता करणे १०.५० लक्ष
११) शांतीकिरण सोसायटी (महादेव मंदिर) ते अष्तपुरेमळा रस्ता कॉक्रीटीकरण १०.५० लक्ष
१२) रायवाडी गणेश काळभोर घर ते बोरकर घरापर्यंत रस्ता काँक्रीतीकरण
१३) महात्मा फुले नगर मारुती मंदिर ते प्रदेप गायकवाड घर रस्ता काँक्रीटीकरण १०.५० लक्ष
१४) रायवाडी नामदेव काळभोर घर ते सुभाष काळभोर घर रस्ता कॉक्रीटीकरण १०.५० लक्ष
१५) सोलापूर रोड ते सुभाष बोरकर घर रस्ता कॉक्रीटीकरण १०.५० लक्ष
१६) माळीमळा रोड ते कामठे घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण १०.५० लक्ष
१७) रायवाडी नाना काळभोर ते सागर काळभोर घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण १०.५० लक्ष
१८) लोणी काळभोर मोगलेवस्ती येथे संरक्षक भिंत बांधकाम करणे १०.५० लक्ष
१९) योगेश काळभोर घर ते दत्तात्र बाजीराव काळभोर घरापर्यंत रस्ता करणे १०.५० लक्ष
२०) पांढरी मळा ते धुमाळ मळा ३०५४ अंतर्गत सिमेंट रस्ता करणे ४० लक्ष
२१) नांदे पाटील वस्ती स्मशाणभुमी सुधारणा करणे २० लक्ष
२२) राहिंज वस्ती-दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता करणे २० लक्ष
२३) पाषाणकर बाग दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता करणे १६ लक्ष
२४) सिद्धार्थ नगर पाषाणकर बाग-दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता करणे १५ लक्ष
२३) बाजारमळा दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता करणे ०८ लक्ष
याचा समावेश आहे.