Categories: Previos News

खंडणी प्रकरणातील फरारी आरोपी जेरबंद, दौंड पोलिसांची कारवाई

दौंड : दौंड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुन्हे करून फरार झालेल्या आरोपींना जेरबंद करून त्यांना जेलची हवा दाखविण्याची मोहीम दौंड पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलिसांच्या पथकाने पोलीस रेकॉर्डवरील विविध गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपींना पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे, त्या अनुषंगाने खंडणी प्रकरणात फरार असलेल्या विकी उर्फ आप्पा संजय पानसरे(वय 25,रा. सिद्धार्थ नगर, दौंड) यास दौंड पोलिसांनी जेरबंद केले आहे. विकी येथील मिशन हॉस्पिटल परिसरात आला असल्याची खबर मिळताच पोलिसांनी परिसरात शोध घेतला. पोलीस आपल्या मागावर असल्याची चाहूल लागल्याने विकी पळून जाण्याच्या प्रयत्नात होता, मात्र पोलिसांनी पाठलाग करीत त्याला ताब्यात घेतले.पो. नि. विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उप. निरीक्षक आबनावे,पो. हवा. चौधरी,पो. अमलदार शेखर झाडबुके, भोंगळे या पथकाने सदरची कामगिरी बजाविली.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

20 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago