दौंड : जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे आगमन दौंड तालुक्यातील केडगाव चौफुला येथे झाले असता दौंडचे आमदार राहुल कुल व त्यांच्या पत्नी सौ. कांचन राहुल कुल यांनी पालखीचे स्वागत केले.
यावेळी आमदार राहुल कूल आणि सौ.कांचन कूल हे कार्यकर्त्यांच्या आग्रहखातर फुगडी खेळताना दिसले.
राज्यात सध्या मोठी राजकीय घडामोड घडत असून या घडामोडीत आमदार राहुल कूल यांनाही अनन्य साधारन असे महत्व आहे. कारण संपूर्ण पुणे जिल्ह्यात ते भाजपचे एकमेव आमदार आहेत जे भाजप विरोधी लाट असूनही निवडून आले आहेत आणि ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास विश्वासुंपैकी एक आहेत.
संत तुकाराम महाराजांच्या पालखीत आमदार राहुल कूल यांच्या चेहऱ्यावर असणारा विलक्षण आनंद खूप काही सांगून जात होता त्यामुळे दौंडकरांना लवकरच गुडन्यूज मिळेल असे भाकीत राजकीय पटलावर व्यक्त केले जात आहे.