अहमदनगर : बनावट बँक अधिकारी बनून बँकेतून कर्ज मंजुर करुन देतो असे म्हणून पैसे उकळणारे पश्चिम बंगाल येथील ४ तर झारखंडचा १ अशा ५ जणांना अटक करण्यात अहमदनगर च्या कोतवाली पोलिसांना यश आले आहे.
दि.१४/०६/२०२३ रोजी कोतवाली पोलिसांना मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयातील मिरा रोड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किरण वंजारी यांच्याकडून माहिती मिळाली की त्यांच्या हद्दीतून फसवणूक करणारी टोळी ही नगरकडे येत आहे. ती आपल्या हद्दीत सुद्धा गुन्हे करू शकते. कोतवाली पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता अहमदनगर शहरातील कापडबाजार मोचीगल्ली परिसरात तसेच अहमदनगर शहरात विविध ठिकाणी काही इसम हे बँकेतील अधिकारी, कर्मचारी असल्याचे खोटे सांगुन व्यापा-यांना व्यवसायाकरिता कर्ज मंजुर करुन देतो असे म्हणुन त्यांचेकडुन कागदपत्र, बँकेतील चेक घेवुन त्यांना सदर कागदपत्राच्या आधारे फसवेगिरी करत आहेत असे लक्षात आले.
सदरच्या टोळीतील एक सदस्य हा कापडबाजार, मोचीगल्ली एका व्यापा-याच्या दुकानात आलेला आहे. तो टाटा कॅपीटल फायनान्स कडुन आलो आहे असे सांगुन त्या व्यापा-याकडुन त्याचे कागदपत्र तसेच पैसे, चेक, फोटो हे घेवुन त्यांना बनावट कागदपत्रांवर टाटा कॅपिटल फायनान्स कंपनीचे लोन दस्तऐवज तयार करत असल्याचे लक्षात आले. त्यास चौकशी कामी ताब्यात घेतले असता त्याने त्याचे आणखी साथीदार यांच्या बाबत ठावठिकाण्याची माहिती दिली नाही. कोतवाली पोलिसांनी नगर शहरातील आठ ते दहा लॉज चेक केले आणि तांत्रिक माहितीच्या आधारे सदर आरोपीचे इतर ४ साथीदार अभिषेक लॉज माळीवाडा येथून ताब्यात घेतले.
त्यांचेकडे विविध कंपनीचे बँकेतील ओळखपत्र तसेच त्यांचे फोटो असलेले वेगवेगळया बनावट नावाची आधारकार्ड, मोबाईल फोन, तसेच विविध बँकेचे बनावट आयकार्ड, बँकेचे बनावट शिक्के, काही रिमुएबल पेन असा एकुन ७५ हजार रुपयांचा मुददेमाल मिळुन आला आहे. सदर प्रकरणामध्ये आरोपी १) मोहम्मद अब्दुल कुदस मेहबुब, (वय ३४ रा उर्दु शाळा जवळ ता लखना जिल्हा हजारी बाग राज्य झारखंड) २) एतेशाम एमडीनईम आलम, (वय ३४ वर्ष रा ३० / २४ राईचारण घोसलाई कोलकत्ता) ३) अजीज लतीफ शेख अब्दुल (वय ३४ रा २८/ A मोमीनपुर रोड, कोलकत्ता) ४) मुकेश कुमार दुर्योधन नायक (वय २६ रा २३४/४ AJC बोस रोड कोलकत्ता पश्चिम बंगाल) ५) गंगा लक्ष्मी सहा, (वय ४५ वर्ष, रा सोनारपुर २४ पडगाना कलकत्ता) यांचा समावेश असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तक्रारदार व्यापा-याची वरील आरोपींनी ते कोणत्याही बँकेचे अधिकारी व कर्मचारी नसतांना देखील बँकेचे बनावट कागदपत्र व शिक्के सोबत बाळगुन फसवणुक करत असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं ६२०/२०२३ भादंवि ४२०, ४७१, ४६८, ३४ प्रमाणे गुन्हा रजि दाखल करण्यात आला असून त्यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यात त्यांना अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोसई मनोज कचरे हे करत आहेत.
एकाच व्यक्तीची पाच ते सहा बनावट ओळखपत्र.
एकाच व्यक्तीची चार ते पाच बनावट आधार कार्ड, बनावट टाटा फायनान्स चे ओळखपत्र असे साहित्य मिळून आले. तसेच या आरोपींनी अहमदनगर पुणे मुंबई नाशिक औरंगाबाद गुजरात मध्य प्रदेश या ठिकाणी फसवणूक केली असल्याचे उघड होत आहे. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात टाटा फायनान्स कंपनीचे बनावट कर्ज मंजूर करण्याचे फॉर्म, व्यापाऱ्यांचे चेक, टाटा फायनान्सचे शिक्के व इतर कागदपत्रे मिळून आली.
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोसई मनोज कचरे, पोसई मनोज महाजन, पोहेकॉ तनवीर शेख, पोहेकॉ / गणेश धोत्रे, पोना/ योगेश भिंगारदिवे, पोना/रियाज इनामदार, पोना / योगेश खामकर, पोना/ सलीम शेख, पोना बाप्पुसाहेब गोरे, पोकॉ/ अभय कदम, पोकों/संदिप थोरात, पोकॉ/ अमोल गाढे, पोकॉ/ सुजय हिवाळे, पोकॉ/कैलास शिरसाठ, पोकॉ/सोमनाथ राऊत, पोकों / सागर मिसाळ, पोकॉ अतुल काजळे यांनी केली. या कारवाई कामी मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयातील मिरारोड पोलीस स्टेशन जि ठाणे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर गायकवाड पोलीस उपनिरीक्षक किरण वंजारी, पोहेकॉ महाकुलकर, पोहेकॉ गाडेकर यांचे चांगली मदत झाली.