इंदापूरच्या सोनारास ‛चार महिलांनी’ लुटले! दुकानातील चांदीचे 15 पैंजण जोड घेऊन महिला पसार

इंदापूर : महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात हे आपण ऐकले होते मात्र चांगल्या कामाव्यतिरिक्त गुन्हेगारी कारवायांत आता महिलाही पुरुषांपेक्षा कमी नाहीत हे पुढील घटनेवरून लक्षात येईल.

तर घडले असे की आप्पा मारुती राऊत (रा.इंदापूर, सावतामाळी नगर इंदापूर) यांचे इंदापुरमध्ये सिद्धेश्वर चौकात श्री.सावतामाळी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. दि.23 जानेवारी रोजी दुपारी 2:40 वाजता चार अनोळखी महिला तोंडाला स्कार्फ बांधुन त्यांच्या दुकानात आल्या. त्यापैकी दोन महिला कांउटरवर आल्या आणि त्यांनी राऊत यांना चांदीची जोडवी दाखवा असे फर्मान सोडले. राऊत हे त्यांना जोडवी दाखवत असताना बाकडयावर बसलेल्या दोन महिला लहान
बाळासह कांउटरजवळ आल्या. त्यांनतर त्या चारही महिलांनी राऊत यांनी दाखवलेले पैंजन आम्हाला पसंत नाही असे म्हणुन दाखवलेले 4 ते 5 पैंजन गठ्ठे त्यांनी एकत्र करून दुकान मालक राऊत यांच्याकडे दिले. त्यांनतर त्या चारही महिला दुकानातुन काही खरेदी न
करता निघुन गेल्या. मात्र काही वेळा नंतर राऊत यांना संशय आल्याने त्यांनी पैंजनचे गठ्ठे चेक केले असता त्यापैकी एक गठ्ठा कमी असल्याची त्यांची खात्री झाली. आणि त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता त्यांनी दाखविलेल्या 4 ते 5 पैंजन गठ्ठ्यांपैकी एक गठ्ठा ज्यामध्ये 15 जोड असलेले पैंजन गठ्ठा त्या चार महिलांनी हात चलाखी करत फसवणुक करून घेवुन गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. लागलीच त्यांनी याबाबत इंदापूर पोलीस ठाण्यात जाऊन सादर अनोळखी महिलांबाबत फिर्याद दिली असून त्या चार अनोळखी महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदापूर पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्या महिलांचा शोध घेत आहेत.