Categories: पुणे

धक्कादायक – लोणीकाळभोर येथे सौचालयाची टाकी साफ करताना ‘चौघांचा’ मृत्यू! मृतांमध्ये एका ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचाही समावेश

पुणे : लोणीकाळभोर येथील कदम वाकवस्ती जवळ सौचालयाची टाकी साफ करताना चौघांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या मृतांमध्ये ग्रामपंचायतच्या माजी कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. मृतांमध्ये दादा पोपट कसबे, पद्माकर मारुती वाघमारे, कृष्णा दत्ता जाधव, सुवर्ण नवनाथ कांबळे या चौघांचा समावेश आहे.
लोणी काळभोर पोलीसांडून मिळालेल्या माहितीनुसार कदम वाकवस्ती जवळ असणाऱ्या प्यासा होटेलच्या पाठिमागे जय मल्हार कृपा नामक इमारत असून या इमारतीमध्ये असणाऱ्या शौचालयाची टाकी साफ करण्याचे काम सुरू होते.
या इमारती मधील या टाकीची स्वच्छता करत असताना यात अचानक हे सर्वजण खाली
पडले. यातील दोघांचा गुदमरून जागीच मृत्यू
झाला होता तर एका व्यक्तीला रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र हे सर्व होत असताना खबर मिळाली की यात तब्बल चारजण पडले असून त्याचाही शोध घेण्याचे काम सुरु झाले. आत पडलेल्या चौथ्या व्यक्तीचा मृतदेह सापडल्यानंतर यातील जखमी व्यक्तीचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे मृतांचा आकडा वाढून त्यांची संख्या चार झाली आहे. अधिक तपास लोणी काळभोर चे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

18 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago