Categories: क्राईम

दौंड शहरातील ॲट्रॉसिटी, मारहाण प्रकरणी चौघांना लोणावळा येथून अटक

दौंड : दौंड शहरातील गाजलेल्या ॲट्रॉसिटी आणि मारहाण प्रकरणी दौंड पोलिसांनी आज पुन्हा 3 आरोपिंना लोणावळा येथून अटक केली असून आत्तापर्यंत अटक आरोपिंची संख्या ही 4 झाली आहे.

पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 547 / 2022 मधील फरार आरोपींपैकी 1) ईलास उर्फ इलाईस इस्माईल शेख 2) वाहीद जावेद खान 3) सुफियान उर्फ जुम्मा रमजान शेख सर्व आरोपी (राहणार कुंभार गल्ली तालुका दौंड जिल्हा पुणे) यांना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण यांनी लोणावळा खंडाळा परिसर येथून अटक केली असून यापूर्वी जिलानी बादशहा शेख (राहणार कुंभार गल्ली) यास दौंड पोलीसांनी यापूर्वीच अटक केली आहे.

दौंड मधील हाणामारी, ॲट्रॉसिटी प्रकरणी नुकतेच आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शहरात आंदोलन करण्यात आले होते. आरोपींना 48 तासात अटक करा अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करु असा इशारा नितेश राणे यांनी दिला होता. त्यामुळे झालेल्या अटक सत्राला महत्व प्राप्त झाले आहे. दौंड दशहरातील कुंभार गल्ली परिसरात राहणाऱ्या दोन गटांमध्ये हाणामारी होऊन या प्रकरणाने गंभीर वळण घेतले होते. या प्रकरणांमध्ये मा. नगराध्यक्ष बादशाह शेख यांसह वीस लोकांविरोधात ॲट्रॉसिटी व इतर गंभीर गुन्ह्यांची नोंद दौंड पोलिसांनी केली होती.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

19 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago