वन विभागाकडून केडगाव येथील बिबट्याचा हल्ला झालेल्या जागेची पाहणी, शेतकऱ्याला शासकीय मदत मिळणार

केडगाव, दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव येथे तुकाई मंदिर परिसरात बिबट्या सदृश प्राण्याने दोन ननवरे यांच्या शेतामध्ये त्यांच्या दोन कालवडिंवर हल्ला करून त्यांना ठार केले होते. ही घटना शुक्रवार दिनांक ११ जुलै रोजी सकाळी ८:०० ते ८:३० च्या दरम्यान घडली होती. यानंतर ननवरे यांचा मुलगा ऋषिकेश उर्फ गोरख याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधत याची माहिती दिली होती.

यानंतर रात्री ९:३० च्या दरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वन अधिकारी राहुल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी भेट देत संपूर्ण परिसराची पाहणी केली. यावेळी वनविभागाच्या अधिकारी वीर मॅडम यांनी शेतकरी आणि ग्रामस्थांनी दक्ष राहून काळजी घेण्याचे आवाहन केले तसेच या ठिकाणी शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून त्यास शासकीय मदत मिळण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

काल घटना घडल्यानंतर वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी लवकर आले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती मात्र दिवसभर शासकीय कामामामुळे अधिकारी, कर्मचारी येऊ शकले नव्हते अशी माहिती वीर मॅडम यांनी देत रात्री ९:३० च्या दरम्यान त्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.