Categories: सामाजिक

आईच्या 6 व्या पुण्यस्मरणानिमित्त अन्नदान उपक्रम

केडगाव (दौंड) : केडगाव, आंबेगाव पुनर्वसन येथील सामाजिक कार्यकर्ते आजिम पानसरे यांच्या मातोश्री व भाजप महिला आघाडीच्या सौ.आफरिन आजिम पानसरे यांच्या सासूबाई  शाबिरा बी बबनभाई पानसरे यांच्या सहाव्या पुण्यस्मरणनिमित्त यवत येथील मदरसामध्ये अन्नदान करण्यात आले. यावेळी त्यांच्या घरी मदरसा मधील मुलांनी पवित्र कुरआन पठण केले.

गेल्या सहा वर्षांपासून शाबिरा बी यांच्या पुण्यस्मरणनिमित्त दर वर्षी अजिम पानसरे व आफरीन पानसरे या दांपत्याकडून वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात. गेल्या वर्षी रक्तदान शिबिराचे हि आयोजन करण्यात आले होते. तर त्या अगोदरही सामाजिक उपक्रम राबवून दानधर्म करण्यात आला होता.

आजिम पानसरे आणि त्यांच्या पत्नी सौ.आफरिन पानसरे हे नेहमीच समाजकार्यात हिरीरीने भाग घेत आले आहेत. आईच्या प्रत्येक पुण्यस्मरणदिनी आपण सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचे ते सांगतात. चालू श्रावण महिण्यात या दांपत्याने पुरंदरच्या भुलेश्वर मंदिर येथे अन्नदानाचा उपक्रम राबवला होता. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक झाले होते.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

10 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago