Categories: पुणे

आधी आरक्षण, मग इलेक्शन.. प्रशासना विरोधात हडपसर मध्ये यल्गार | लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचे हडपसरमधून येणार शेकडो अर्ज

पुणे : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यास पाठिंबा देण्यासाठी हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने समाजाची बैठक झाली, सरकारने फसवणूक केल्याच्या निषेधार्थ लोकसभा निवडणुकीत हडपसर विधानसभा मतदारसंघात शंभरहून अधिक उमेदवारी अर्ज भरण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला. मराठा समाजाचे बांधव मोठ्या संख्येने या बैठकीत सहभागी झाले होते.

राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देतो असे सांगून ज्या मागण्या आंदोलक म्हणून जरांगे पाटील यांनी केल्या त्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून दहा टक्के आरक्षण देऊन समाजाची बोळवण केली, आंतरवाली सराटी येथे 24 मार्च रोजी राज्याची बैठक होत असून या बैठकीत जास्तीत जास्त संख्येने हडपसर परिसरातून समाज बांधवांनी जाण्याचे आवाहन करण्यात आले.

या बैठकीप्रसंगी काही महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले त्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीत हडपसर विधानसभा मतदारसंघात शंभरहून अधिक समाजाच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज भरणे, समाजातील बांधवांवर दाखल झालेले गुन्हे शासनाने मागे घ्यावेत, तसेच 24 मार्च बैठकीतील निर्णयानुसार पुढील दिशा ठरविली जाईल.

मराठा समाज बांधवांची आज हडपसर मध्ये बैठक झाली या बैठकीत लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे व 24 मार्च रोजी होणाऱ्या बैठकीतील निर्णयाप्रमाणे पुढील दिशा ठरविण्याचे ठराव संमत करण्यात आले आहेत. कोणते राजकीय पक्षाचा प्रचार न करता जो समाजासाठी उभा राहील तो आमचा उमेदवार राहील असे मराठा आरक्षण समन्वयक समिती कडून जाहीर करण्यात आले आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

10 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago