Categories: मुंबई

धक्कादायक | आधी प्रेयसीचे तुकडे केले नंतर कुकरमध्ये शिजवून मिक्सरमध्ये वाटले… मुंबईतील धक्कादायक प्रकार उघड

मुंबई : लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीचे तुकडे करून पुरावा नष्ट करण्यासाठी ते तुकडे कुकरमध्ये शिजवले नंतर ते मिक्सरमध्ये वाटून काही तुकडे कुत्र्यांना तर काही तुकडे गटारीच्या पाण्यात टाकून दिल्याची धक्कादायक घटना मुंबईतील मिरारोड भागात उघडकीस आली आहे.

हा भयंकर मिरारोड भागातील आकाशगंगा सोसायटीमध्ये घडला असून यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.
या 56 वर्षीय आरोपीचे नाव मनोज साने असे असून त्याने 32 वर्षीय सरस्वती वैद्य या महिलेची हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी वरील भयंकर प्रकार अजमावला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न होत आहे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मनोज साने आणि सरस्वती वैद्य हे 3 वर्षांपासून लिव्ह इन रिेशनशिपमध्ये राहत होते.

त्यांच्यात वाद झाल्यानंतर आरोपी मनोज याने या महिलेची हत्या केली बाजारातून करवत आणली आणि मृतदेहाचे तुकडे केले. तुकडे केलेल्या मृतदेहाचा वास येऊ नये म्हणून त्याने त्या महिलेचे तुकडे अगोदर कुकर मध्ये शिजवले नंतर ते मिक्सरमध्ये वाटले. मात्र तरीही दुर्गंधी येतच राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. विचित्र वासाने हैराण झालेल्या नागरिकांनी पोलिसांत तक्रार दिली आणि त्यांनतर या प्रकरणाला वाचा फुटून सर्व प्रकरण उघडकीस आले आहे.

Team Sahkarnama

Share
Published by
Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

13 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago