Fire in Virar – विरार येथील रुग्णालयाला आग! 12 कोरोना रुग्णांचा मृत्यू



| सहकारनामा |

मुंबई :

राज्यात सध्या हॉस्पिटल आणि कोविड सेंटरमध्ये अपघात होण्याची घटना वाढू लागल्या आहेत. 

नुकतीच नाशिक येथील महापालिकेच्या रुग्णालयाचे ऑक्सिजनची गळतीहोऊन 22 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागल्याची घटना घडली होती. हि घटना घडून दोन दिवस होत नाहीत तोच पुन्हा एकदा विरार येथे एका रुग्णालयाला आग लागून 12 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचे समोर येत आहे. 

मिळत असलेल्या माहितीनुसार विरार च्या  पश्चिम भागात असणाऱ्या  विजय वल्लभ रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या आयसीयू विभागात ही आग लागली होती. ज्यामध्ये 12 कोविड रुग्णांचा मृत्यू झाला. आग लागली त्यावेळी आयसीयू  विभागात जवळपास 17 कोरोना रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी 12 रुग्णांचा यात मृत्यू झाला. 

मध्यरात्री 3 च्या सुमारास हि आग लागल्याचे सांगितले जात असून या भीषण आगीत पाहता पाहता 12 जनांचा मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुळसळ यांनी दिली आहे.