पुणे तिथे काय उणे..
उपचार करताना कुत्र्याचा मृत्यू, कुत्र्याच्या मालकाने केला डॉक्टरवर गुन्हा दाखल

पुणे : पुणे तिथे काय उणे अशी एक म्हण आहे. पुण्यात कधी, काय घडेल याचा नेम नाही. पुण्यातील श्वानाच्या एका डॉक्टरला याचा चांगलाच अनुभव आला असून कुत्र्यावर उपचार करता असताना त्या कुत्र्याचा मृत्यू झाल्यानंतर कुत्र्याच्या मालकाने थेट डॉक्टरवरच गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी संकेत संभाजी बानकर (वय, 26 कोल्हेवाडी ता. हवेली, जि.पुणे) यांनी फिर्याद दिली की त्यांचा लॅब जातीचा श्वान (वय ७ वर्षे) हा दि.२४/११ / २०२१ रोजी पासुन
आजारी होता. त्यामुळे त्यास दि.२५/११/ २०२१ रोजी त्यास स्मल क्लीनीक येथील डॉ. संदिप गायकवाड (माणिक बाग, स्मल क्लिनिक, सिंहगड रोड पुणे) यांचे दवाखान्यात औषध उपचार चालु केले होते. परंतु या औषधोपचाराचा काही एक परीणाम झाला नाही. सदर डॉक्टरांनी त्या श्वानास चुकिची औषधे दिल्यामुळे त्यांचा श्वान मयत झाला असावा असा फिर्यादी यांना संशय आहे. त्यामुळे त्यांनी डॉ. संदिप गायकवाड यांच्या विरोधात फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरुन हवेली पोलीस ठाण्यात भादवी कलम 429 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.