| सहकारनामा |
मुंबई :
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरूद्ध सीबीआयने एफआयआर (Anil Deshmukh Against FIR) दाखल केला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी त्यांच्यावर 100 कोटींची वसुली करण्याचे आदेश दिले होते असा आरोप त्यांनी केल्यानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
सीबीआयकडून महाराष्ट्र चे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरूद्ध दिल्लीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआय अनेक ठिकाणी शोधही घेत आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर सीबीआयकडून मुंबईत अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात येत असून यामध्ये देशमुख यांच्या निवासस्थानाचाही यात समावेश आहे.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना राज्याच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. परमबीर सिंग यांनी एक पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते.
परमबीर सिंह यांनी असा आरोप केला होता की अनिल देशमुख सचिन वाजे यांना त्यांच्या घरी भेटत असत. तसेच, दरमहा मुंबईतून 100 कोटी रुपये वसूल करण्याचेही त्याने सांगितले होते.