Categories: क्राईम

अखेर ती शंका खरी ठरली, त्या ‘सात जणांची हत्याच’! वंशाला दिवा ठेवायचाच नाही यावरून चिमुकल्यांनाही सोडले नाही… घटनास्थळावरून माहिती घेत असताना ‘या’ गोष्टीमुळे वाढला होता ‘हत्येचा’ संशय

दौंड : संपूर्ण पुणे जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या पारगाव येथील भीमा नदी पात्रात सापडलेल्या सात मृतदेहांचे गूढ उकलले असून हि आत्महत्या नसून हत्याच आहे हे आता सिद्ध होताना दिसत आहे. पवार यांच्या भावकीने जुन्या वादातून हे हत्याकांड घडवल्याचे आता समोर येत असून आमचा मुलगा गेला, आता यांच्याही वंशाला दिवा ठेवायचा नाही या खुनशितून हे हत्याकांड घडल्याचे समोर येत आहे. याबाबत अधिकृत माहिती मात्र पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडून काही वेळात मिळणार आहे.

विविध सोर्समधून प्राप्त होत असलेल्या माहितीनुसार या सर्व सात जणांची हत्या करून त्यांना भीमा नदीपात्रात आणून टाकल्याची धक्कादायक माहिती मिळत असून या सातजणांमध्ये तीन लहान चिमुरड्यांचाही समावेश आहे.
हत्या करण्यात आलेल्यांमध्ये मोहन उत्तम पवार (अंदाजे वय 50 वर्षे) संगीता मोहन पवार (अंदाजे वय 45 वर्षे, दोघे मूळ रा.खामगांव ता.गेवराई) त्यांचे जावई शामराव पंडित फुलवरे (अंदाजे वय 32 वर्षे) त्यांची पत्नी राणी शामराव फुलवरे (अंदाजे वय 27 वर्षे) शामराव फुलवरे यांचा मुलगा रितेश शामराव फुलवरे (वय 7 वर्षे) छोटू शामराव फुलवरे (वय 5 वर्षे) आणि कृष्णा (वय 3 वर्षे) या 7 जणांचा समावेश असून पारगावच्या भीमा नदी पात्रामध्ये हे मृतदेह आढळून आले होते.

हा अपघात आहे, घातपात आहे कि आत्महत्या यावरून मोठ्या शंका कुशंका घेतल्या जात होत्या. प्राथमिकरित्या ह्या आत्महत्या असल्याचे सांगितले जात होते मात्र जर ह्या आत्महत्या होत्या तर मगनिघोज आणि शिरूर येथे नदी असताना त्यांनी 55-60 किमी दूर येऊन आत्महत्या का केली? ते कोणत्या वाहनातून आत्महत्या करायला येथे आले? ते वाहन कुठे आहे? जर ते पायी आले तर सातजन इतक्या दूर पायी येऊन आत्महत्या करतील का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते.

त्यातच लहान मुलांच्या बॉडी बाहेर काढल्यानंतर प्रथमदर्शनी त्या मुलांच्या जीभ बाहेर आल्याचे स्थानिक सांगत होते. त्यामुळे पाण्यात पडल्यानंतर जीभ बाहेर येण्याचे काय कारण असे प्रश्न उपस्थित होत होते. एकीकडे आत्महत्या असे जाहीर केले जात असताना सहकारनामा ने मात्र या आत्महत्या नसून हत्याच असल्याची शंका नातेवाईकांच्या हवाल्याने उपस्थित केली होती ती शंका आज खरी ठरल्याचे समोर येत आहे.

काट्यातून काटा काढला
मिळत असलेल्या माहितीनुसार यातील मृत पवार कुटुंबियांच्या भावकीतील लोकांनी आपल्या मुलाच्या अपघाती मृत्युचा जुना राग मनात धरून पवार व फुलवरे कुटुंबियांना संपविण्याचा प्लॅन आखला होता. मात्र त्यांना हत्या करण्यास योग्यवेळ सापडत नव्हती. पवार यांच्या मुलाने एक मुलगी पळवून नेली आणि पवार यांच्या भावकीला हि संधी आयतीच सापडली. हत्या केल्यानंतर संशय मुलीच्या आई, वडील आणि नातेवाईकांवर जाईल आणि आपला प्लॅन सफल होईल असे पवार यांच्या भावकीला वाटले आणि काहीकाळ तसे चित्रही रंगले. मात्र पोलिसांच्या चाणाक्ष बुद्धितून काहीच सुटू शकत नाही त्यामुळे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेशन विभाग (LCB) आणि यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या अथक प्रयत्नाने या हत्या कि आत्महत्येचे गूढ उकलण्यात आता यश येत आहे. याबाबत काही वेळातच पोलीस अधीक्षकांकडून पत्रकार परिषद घेऊन सर्व माहिती दिली जाणार आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

19 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago