Categories: क्राईम

‛बोरीपार्धी’ ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांवर ‛अट्रॉसीटी’ चा गुन्हा दाखल

दौंड : दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथील ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांवर अट्रॉसीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दापोडी येथील शिक्षक मिलिंद शंकर चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी मिलिंद चव्हाण यांनी शाळेचे भौतीक आणि शैक्षणीक सुविधेची मागणी करण्याकरीता ग्रामपंचायत कार्यालय बोरीपार्धी येथे अर्ज घेवुन तेथील ग्रामसेवक विठ्ठल चंद्रकांत रावते यांना सदरचा अर्ज दिला होता. यावर ग्रामसेवक यांनी फिर्यादी यांना तुम्ही मागच्या मिटींगला का उपस्थीत राहीला नाही असे विचारले असता फिर्यादी यांनी त्यांना तुम्ही
माझे साहेब नाही. माझे साहेब मला विचारतील असे बोलले. त्यावर चिडुन जावुन त्यांनी फिर्यादीने दिलेल्या अर्जावरील केलेली सही पेनाने खोडुन फिर्यादी यांच्या अंगावर अर्ज फेकुन देवुन फिर्यादीला हाताने व
लाथाबुक्याने मारहाण करून ग्रामपंचायत
कार्यालय बोरीपार्धी (ता. दौंड) येथुन चालता हो असे म्हणत फिर्यादी यांना ग्रामपंचायत कार्यालयाचे बाहेर ढकलत आणले. व ग्रामपंचायत कार्यालयाचे बाहेर ही मारहान करून जातीवाचक शिवीगाळ केली असे फिर्यादीत म्हटले आहे.
पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. धस हे करीत आहेत.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

13 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

15 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

17 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago