Categories: पुणे

‛युट्युब’ चॅनेलवरून ‛छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज’ यांची बदनामी करणाऱ्या प्राचार्याविरोधात गुन्हा दाखल करा, दौंडमधील सर्व पक्ष, संघटनांच्या वतीने पोलिसांना निवेदन

दौंड : सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी एका प्राचार्याने युट्युब चॅनलच्या माध्यमातून बदनामीकारक वक्तव्य केले असल्याचे समोर आले आहे. महाराजांची बदनामी करणाऱ्या व हिंदू-मुस्लीम समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे कृत्य करणाऱ्या, प्राचार्य व त्याचा सहकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी येथील सर्व पक्ष व संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. दौंडचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना यावेळी मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनामध्ये असे नमूद केले आहे की प्रा. घोडेकर व त्याच्या सहकार्याने पाबळ येथील मस्तानी स्मारकासमोर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी बदनामीकारक विधाने करून त्याचे चित्रीकरण युट्युब माध्यमाद्वारे प्रसारित केले आहे. तसेच मस्तानी यांच्या स्मारकाविषयी सुद्धा हिंदू-मुस्लीम बांधवांमध्ये तेढ निर्माण होईल असेही विधान केले आहे. या दोघांनी संगनमताने केलेल्या कृत्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, व त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. समाजविघातक कृत्य करणाऱ्या घोडेकर व त्याच्या सहकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देतेवेळी आबासो. वाघमारे, निखिल स्वामी, सचिन कुलथे, सागर उबाळे, चंदर गवारी, अजय सकट, विक्रम पवार, संदीप बोराडे, मंगेश साठे व अशोक जगदाळे आदि उपस्थित होते.

Team Sahkarnama

Recent Posts

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

3 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

23 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago