| सहकारनामा |
नवी दिल्ली : कोरोना पासून स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करायचा असेल तर आता प्रत्येकाने नुसते घराबाहेरच नाही तर घरातही मास्क लावण्याची वेळ आली आहे असा इशारा नीती आयोगाचे सदस्य असलेले डॉ.पॉल यांनी दिला आहे.
नीती आयोग समिती सदस्य डॉ. वीके पॉल सांगितले हि वेळ कोणाला घरात आमंत्रण देण्याची नसून स्वतः घरात देखील मास्क लावून बसण्याची आहे, आणि या इलाजाशिवाय आता पर्याय नाही असे सांगितले आहे.
देशातील कोरोना वाढीच्या संसर्गाच्या दरम्यान आता सरकारच्या धोरणानुसार डॉ. वीके पॉल यांनी सांगितले की ही वेळ घरात मास्क लावून बसण्याची असून जर तुम्हाला कुठलेही नॉर्मल लक्षण दिसले तर स्वतःला घरातच आयसोलेट करावे असे सांगितले आहे.
याबाबत डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की तुम्हाला लक्षने दिसली आणि तुम्ही स्वतःची टेस्ट करुन घेतली आणि त्यामध्येही निगेटिव्ह आले तरी स्वतःला आयसोलेट करून घरातही मास्क परिधान करावे जेणेकरून तुमच्या कुटुंबाला कुठलीही बाधा पोहचू शकणार नाही.
याबाबत स्वास्थ्य संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी माहिती देताना एक कोरोना संक्रमित व्यक्ती महिन्याभरात जवळपास 406 लोकांना बाधित करू शकतो आणि याचे पुढील परीणाम काय होतात हे आपल्याला माहीतच आहे असे त्यांनी आवर्जून नमूद केले.