Categories: देश

देशातील लसीकरण पोहोचले 97 कोटींच्या पुढे, तर रुग्ण बरे होण्याचा दरही पोहोचला 98 टक्क्यांच्या पुढे.. जाणून घ्या देशातील आजची सध्य स्थिती

नवी दिल्ली :
कोरोनाने देशात सर्वत्र हा..हा कार माजविल्यानंतर संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणावर लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आणि त्याचा चांगला परिणामही दिसून येत आहे.
आज दि.15 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 30 लाख 26 हजार 483 मात्रा देण्यात आल्या असून भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांच्या एकूण संख्येने (97.14 कोटी) म्हणजेच 97 कोटी 14 लाख 38 हजार 553 मात्रांचा टप्पा पार केला आहे. देशभरात 95 लाख 66 हजार 873 कॅम्पच्या आयोजनातून हे लसीकरण करण्यात आले आहे.
मिळत असलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत संपूर्ण देशात 19 हजार 391 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे देशात (महामारीची  सुरुवात झाल्यापासून) आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 3 कोटी 33 लाख 82 हजार 100 इतकी झाली आहे.
परिणामी, सध्या देशातील कोरोना महामारीतून मुक्ती चा दर  98.07% इतका झाला आहे. मार्च 2020 पासून आतापर्यंतच्या कालावधीतील हा उच्चांकी कोरोना रोगमुक्ती दर मानला जात आहे.
केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि सह्योगात्मक प्रयत्नांमुळे, गेले सलग 110 दिवस नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या 50,000 हून कमी असण्याचा कल कायम आहे. गेल्या 24 तासांत,16 हजार 862 नव्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 2 लाख 03 हजार 678 इतकी आहे आणि ही गेल्या 216  दिवसातील  सर्वात कमी रुग्णसंख्या आहे हे विशेष. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 0.60% इतके आहे.
देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमता विस्ताराचे काम जारी आहे. गेल्या 24 तासांत देशात एकूण 11 लाख 80 हजार 148 चाचण्या करण्यात आल्या असून देशात आतापर्यंत 58 कोटी 88 लाख 44 हजार 673 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशभरात कोविड चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 1.42 % असून गेले 112 दिवस हा दर 3% हून कमी राहिला आहे. तर दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज 1.43% आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर गेले सलग 46 दिवस 3% हून कमी आहे आणि आता गेले सलग 129  दिवस हा दर 5% हून कमी राहिला आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

10 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

23 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago