Categories: Previos News

Fight Against Corona : समाधानकारक – यवत ग्रामिण रुग्णालयाच्या हद्दीतील गावांमध्ये कोरोना होण्याचे प्रमाण घटून 13% टक्क्यांवर आले! ‛या’ 18 गावांतील 240 स्वॅब पैकी अवघे 31 जण पॉझिटिव्ह



| सहकारनामा |

दौंड : दौंड तालुक्यातील यवत ग्रामिण रुग्णालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या गावांमध्ये कोरोना बाधितांचे प्रमाण घटले आहे (Fight Against Corona). 

मागील आठवड्यामध्ये कोरोना होण्याचे प्रमाण हे जवळपास 30% इतके होते. मात्र आता हे प्रमाण  13% टक्क्यांवर आले असल्याने परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार दि. 23/4/2021 रोजी 240 जणांचे स्वॅब पुण्यातील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. पाठविण्यात आलेल्या 240 स्वॅब पैकी 209 जनांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून यात अवघे 31 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने थोडे समाधानकारक चित्र निर्माण झाले आहे. (Fight Against Corona)

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये 24 पुरुष आणि 7 महिलांचा समावेश आहे.

पॉझिटिव्ह आलेल्या गावांमध्ये                                                                  

 यवत 4, सुपा 1, देऊळगाव गाडा 1, केडगाव 4, दौंड 1, पिंपळगाव 2, राहू 4, नाथाचीवाडी 1, तांबेवाडी 1, सहजपूर 1, चौफुला 2, भांडगाव 3, खामगाव 1, खुटबाव 1, वरवंड 1, वाखारी 1, दापोडी 1, हातवळण 1 असे 31 जण पॉझिटिव्ह आले आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे वय हे 13 वर्षे ते 67 वर्षे या दरम्यान असल्याची माहिती यवत ग्रामिण रुग्णालयाकडून प्राप्त झाली आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

7 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

20 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

22 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

24 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago