| सहकारनामा |
दौंड : दौंड तालुक्यातील यवत ग्रामिण रुग्णालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या गावांमध्ये कोरोना बाधितांचे प्रमाण घटले आहे (Fight Against Corona).
मागील आठवड्यामध्ये कोरोना होण्याचे प्रमाण हे जवळपास 30% इतके होते. मात्र आता हे प्रमाण 13% टक्क्यांवर आले असल्याने परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार दि. 23/4/2021 रोजी 240 जणांचे स्वॅब पुण्यातील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. पाठविण्यात आलेल्या 240 स्वॅब पैकी 209 जनांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून यात अवघे 31 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने थोडे समाधानकारक चित्र निर्माण झाले आहे. (Fight Against Corona)
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये 24 पुरुष आणि 7 महिलांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या गावांमध्ये
यवत 4, सुपा 1, देऊळगाव गाडा 1, केडगाव 4, दौंड 1, पिंपळगाव 2, राहू 4, नाथाचीवाडी 1, तांबेवाडी 1, सहजपूर 1, चौफुला 2, भांडगाव 3, खामगाव 1, खुटबाव 1, वरवंड 1, वाखारी 1, दापोडी 1, हातवळण 1 असे 31 जण पॉझिटिव्ह आले आहेत.
कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे वय हे 13 वर्षे ते 67 वर्षे या दरम्यान असल्याची माहिती यवत ग्रामिण रुग्णालयाकडून प्राप्त झाली आहे.