|सहकारनामा|
पुणे/हडपसर : (प्रतिनिधी)
खासदार नसताना कोव्हीड सेंटर सुरू केले (fight against corona), शासनाच्या नव्या योजनासाठी मुख्यमंत्र्यांशी पाठपुरावा केला आहे, राजकारण बाजूला सारून कोरोना नियंत्रण साठी काम केले, 25 कोटी खर्च करून आंबेगाव येथे जम्बो कोव्हीड सेंटर उभे केले. लसीचा तुटवडा कमी करण्यासाठी आगामी काळात पाठपुरावा करणार आहे, तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी सावध रहावे असे प्रतिपादन माजी खासदार शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.
नगरसेविका प्राची आल्हाट उच्च शिक्षित असून नवखी असूनही अतिशय चांगले काम प्रभागात केले आहे आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहोत असेही आढळराव पाटील यावेळी म्हणाले.
शिवसेना नगरसेविका प्राची आशिष आल्हाट यांच्या पुढाकारातून काळेपडळ येथील राम मंदिर प्रांगणात महापालिकेचे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले, यावेळी मार्गदर्शन करताना आढळराव पाटील बोलत होते.
याप्रसंगी पालिका गटनेते पृथ्वीराज सुतार, शहरप्रमुख संजय मोरे, पालिका सहायक आयुक्त प्रसाद काटकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देशमुख, उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, शहर संघटक समीर तुपे, उपशहर प्रमुख उल्हास शेवाळे, शोभा लगड, राणी परांडे, महापालिकेचे डॉ.दिनेश भेंडे, आशिष आल्हाट, शिवा शेवाळे, विकास भुजबळ, बापूसाहेब घुले, दिलीप कुरणे, आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्याचा निर्णय घेतला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोव्हीड रुग्णांवर उपचार दरावर नियंत्रण आणले, दुसऱ्या लाटेत अनेकांना जीव गमवावा लागला, कोव्हीड नियंत्रण साठी लसीकरण महत्वाचे आहे प्रभागात नागरिकांना वैदकीय सुविधा व लस मिळवून देण्यासाठी कार्यरत राहणार असे मत नगरसेविका प्राची आशिष आल्हाट यांनी व्यक्त केले, कार्यक्रमाचे आयोजन आशिष आल्हाट यांनी केले होते.