Categories: क्राईम

400 किलो ‛गांजाची’ तस्करी करणाऱ्या ‛फिरोज बागवान’ला बारामतीतून ‛अटक’

पुणे : आंध्रपदेशातून 400 किग्रॅ गांजाची तस्करी करताना पळून आलेला मुख्य तस्कर फिरोज बागवान याला बारामतीमधून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई (Lcb) पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आंध्रप्रदेश राज्यातील अलुरी सिताराम राजू जिल्हयातील पदेरू पोलीस स्टेशन हद्दीत दि.25/06/2023 रोजी पदेरू पोलीसांनी अवैध गांजाची तस्करी करणारी महिंद्रा जीप XUV 500 मधून 400 किग्रॅ वजनाचा गांजा जप्त केला होता. सदर कारवाई दरम्यान पदेरु पोलीसांनी आरोपी मताम सीमाद्री रामचंद्र पाडल (रा. गुंद्रमेता, मुंचिंगपुट मंडळ, जि.अलुरी सिताराम राजू, राज्य आंध्रपदेश) यास ताब्यात घेतले होते यावेळी आरोपी फिरोज अजीज बागवान (रा
बारामती ता बारामती जि पुणे) हा पळुन गेला होता. त्याच्यावर एनडीपीएस कायदयांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयातील आरोपी फिरोज बागवान हा बारामती परीसरात असल्याची बातमी उपविभागीय पोलीस अधिकारी (लोणावळा विभाग) सत्यसाई कार्तिक यांना मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि.7 रोजी बारामती परीसरात सापळा लावला होता. त्यावेळी आरोपी फिरोज अजीज बागवान हा सापळ्यात अडकल्यानंतर त्यास पथकाकडून ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपीस पदेरू पोलीस स्टेशनचे अधिकारी व स्टाफ यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.

सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोसई अभिजीत सावंत सहा. फौजदार हनुमंत पासलकर, बाळासाहेब कारंडे, पोहवा अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहीवळे, हेमंत विरोळे यांनी केली आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

13 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago