Categories: पुणे

पाटस टोल प्लाझा समोरच जीवघेण्या खड्डयांचे साम्राज्य, टोल प्रशासनाला आतातरी जाग येईल का..

अब्बास शेख

केडगाव (दौंड) :  पुणे सोलापूर महामार्गावर (pune solapur highway) असणाऱ्या पाटस टोल प्लाझा (patas toll plaza) चा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. चकचकीत आणि खड्डे विरहित रस्त्यांची हमी घेणाऱ्या या टोल प्लाझाच्या (NHAI) समोरच मोठ मोठ्या जीवघेण्या खड्ड्यांनी आपले साम्राज्य उभे केल्याचे आता दिसत आहे. पाटस टोल प्लाझासमोर असलेल्या सेवा रस्त्यावर भले मोठे खड्डे पडलेले असताना ते अजून का बुजविण्यात आले नाहीत असा सवाल येथील उपस्थित करत असून या सर्व प्रकारामुळे दिवसेंदिवस टोल प्रशासनाचे वाभाडे मात्र निघू लागले आहे.

पुणे सोलापूर महामार्गावर असणाऱ्या दौंड तालुक्यातील पाटस येथे अनेक वर्षांपूर्वी मोठ्या दिमाखात हा टोल प्लाझा उभारण्यात आला. या टोल प्लाझा च्या जागेवरून अगोदर वाद विवाद झाले. टोल प्लाझाला देण्यात आलेली जागा आणि बांधकाम करण्यात आलेली इमारत ही वेगवेगळ्या जागी असल्याचे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यावेळी कागदपत्रांच्या आधारे सांगत आंदोलन केले होते. त्यांनंतर बारामतीकडे जाण्यासाठीही टोल आकारण्यात येत असल्याने येथे स्थानिक ग्रामस्थांनी मोठ मोठी आंदोलने केली. कधी बाउंसर तर कधी दादागिरी, भाईगिरी करून वाहन चालकांना येथील कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याच्या घटनांनी हा टोल प्लाझा गाजत आला आहे.

तर आता काही दिवसांपूर्वी येथील राष्ट्रीय महामार्गावर पेव्हर ब्लॉक बसवून खड्डे बुजविण्याचा जगातील पहिला प्रयोगही करण्यात आला. हे सर्व होत असताना येथील टोल प्लाझावर प्रत्येक वाहनाला टोल भरूनच पुढे जावे लागते. मात्र टोल असतो कशाचा तर चकचकीत रस्ते, खड्डे विरहित रस्ते आणि विविध ठिकाणी नागरिकांना सुविधेसाठी बांधलेली सौचालये… मात्र येथे या सुविधा मिळतात का तर प्रवाश्यांच्या तोंडून नाही असेच उत्तर ऐकायला मिळते. कारण ज्या महामार्गावर आणि त्याच्या सेवा रस्त्यांवर भले मोठे खड्डे पडलेले आहेत. त्या खड्डयांमुळे मोठ मोठे अपघात होऊन जीव जाऊ शकतात हे माहित असतानाही हे खड्डे बुजवले जात नाहीत यापेक्षा अजून प्रवाश्यांचे काय दुर्दैव असू शकते असे या रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे.

येथील टोल प्रशासनाच्या आडमुठे भूमिकेमुळे अगोदरच येथील स्थानिक पुरते वैतागले असताना पुन्हा पुन्हा या रस्त्यांच्या होणाऱ्या दुरावस्थेमुळे आता दाद तरी कुणाकडे मागायची असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. पुणे सोलापूर महामार्गावर अनेक ठिकाणी असे खड्डे पडलेले पहायला मिळतात. बातम्या आल्या की काहीदिवस डागडुजीकरून हे खड्डे बुजविले जातात मात्र पुन्हा त्या खड्डयांची परिस्थिती जैसे थे असल्याचे पहायला मिळते.
या सर्व प्रकारामुळे NHAI ची आब्रू मात्र मलीन होत चालल्याचे पहायला मिळत असून येथील टोल प्रशासनाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य चोखपणे पार पाडण्याची गरज आता निर्माण झाली आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

8 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago