Categories: Previos News

Farmers join Shiv Sena : शेतकऱ्यांच्या हाती शिवबंधन, चौफुला येथील शिवसेना भवनात पक्ष प्रवेश सोहळा



|सहकारनामा|

दौंड : दौंड विधानसभा मतदार संघातील शेतकरी संपत शिंदे, रमेश कुदळे, मारुती गावडे, शिवाजी पवार यांनी दि.२३ रोजी  चौफुला येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या उपस्थितीत शिवबंधन बाधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी माउली आहेर, शंकरराव शितोळे, 

 प्रशांत जगताप , विभागप्रमुख हनुमंत निगडे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाप्रमुख महेश पासलकर म्हणाले की शिवसेनेत काही दिवसापूर्वी रयत क्रांती पक्षाचे जिल्हा युवा अध्यक्ष, माउली आहेर यांनी समर्थकासह पक्ष प्रवेश केल्याने तालुक्यातील शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते शिवसेनेत येण्यास इच्छुक असून, रोज नव्या दमाचे कार्यकर्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश करत आहेत.

शिवसेना पक्ष प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी एक वर्षापुर्वी राज्यातील शेतक-यांची कर्जमाफी केली होती त्या अनुशंगाने दौंड तालुक्यांतील शेतक-यांची अंदाजे ४०० कोटी रूपयांची कर्जमाफी झालेली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून शेतकरी हिताचे होत असलेल्या निर्णयांमुळे शेतकरी कार्यकर्त्यांचा शिवसेनेकडे कल वाढत असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

15 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago