Categories: Previos News

fake army mejor in daund – धक्कादायक… संदीप लगड निवृत्त मेजर नाही! दौंड पोलिसांचा मोठा खुलासा, तर लगडसह महिला वकीलावरही ‛या’ कारणामुळे गुन्हा दाखल



|सहकारनामा|

दौंड : निवृत्त मेजर असल्याचे भासवून फसवणुक करणाऱ्या इसमावर दौंडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रशेखर जनार्धन रानडे (वय ६५ वर्ष व्यवसाय सोवानिवृत्त लेप्ट,कर्नल, रा. बी. १७, १/५ सेक्टर १ साईबाबा मंदीराजवळ, वाशी नवी मुंबई ४००७०३)  यांनी तक्रार दिली होती की इसम नामे संदीप वामन लगड (रा. बोरीबेल ता.दौंड जि.पुणे) हा रेजीमेंट ऑफ आर्टीलरी विभाग, नाशिक रोड या सैन्य दलाच्या तुकडीत नाईक या पदावर कार्यरत असताना सैन्य दलाच्या तुकडीतुन पळून आलेला असल्यामुळे त्याला सेवेतुन काढुन टाकण्यात आलेले असताना तो माजी सैनिक असे स्वता:ला म्हणवुन अवैध्यरित्या निवृत्त सैनिकी अधिकारी मेजर. संदीप (भाऊ ) लगड असे असल्याचे सांगतो, वावरतो व स्वत:ची प्रसध्दिी करतो. 

तसेच त्रिदल सैनिक सेवा संघ या संस्थेच्या

छत्राखाली आजी सैनिकांचे कल्याणार्थी असंवैधानीक विधाने करतो. माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीयांचे सभासद नोंदणी करीता स्वताहाचे फायद्यासाठी पैशाची देवाण घेवाण करून संघटनेला हाताशी घेवुन सैनिक कल्याण विभाग व सैनिक कल्याण मंत्री यांचेकडे मी निवृत्त सैनिक मेजर

असल्याचे भासवुन चर्चा व अडचणी सोडवतो असे भासवुन प्रसिध्दी मिळवुन त्या भेटीचे व्हीडीओ सोशल मिडीयावर प्रसारीत करतो. तसेच तो मिलीटरी सैन्याचे मोनोग्राम सैन्याची कॅप याचा वापर

करतो तसेच त्याचे गाडीवर समोर अशोक स्थंभाचा वापर करतो असे नमूद केले होते.  

सदर बाबत श्री चंद्रशेखर रानडे, सोवानिवृत्त लेप्ट. कर्नल यांनी दिले फिर्यादीवरून भा.द.वि.स.कलम १७०, ४२० प्रमाणे

गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास श्री विनोद घुगे, पोलीस निरीक्षक दौंड पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शना खाली ऋषिकेश अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक हे

करीत आहेत.

तसेच आज ता. ११/०९/२०२१ रोजी ११:४५ वा ते १२:०० वा चे दरम्याण मौजे

दौंड ता.दौंड जि.पुणे गावचे हद्दीत एस.डी.पी.ओ ऑफीस मध्ये येवुन इसम नामे १) संदीप वामन लगड, (रा. बोरीबेल ता. दौंड जि.पुणे) २) अॅड. रेश्मा चौधरी (रा. पाबळ ता. शिरूर जि.पुणे) व दोन :

अनोळखी इसम यांनी शिकापुर पोलीस स्टेशन हद्दीतील दिनेश छबन चौधरी (रा. पाबळ ता. शिरूर जि.पुणे) यांचा ४२० कलमा अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यास परवानगी का देत नाही

असे म्हणुन ऑफीस मध्ये येवुन आरेरावीची भाषा वापरली त्यावेळी महिला पोलीस यांनी रेश्मा चौधरी यांना तुम्ही फोन बाहेर गेल्यावर करा असे म्हणताच त्यांनी महिला पोलिसांचा हात झटकुण, धक्का देवुन, तु बाजुला सर नाहीतर मी तुझ्याकडे पण बघते असे म्हणुन सरकारी कामात अडथळा आणला आहे. म्हणुन भा.द. वि.का कलम ३५३,३३२,५०६,३४ प्रमाणे श्रीमती छाया ज्ञानेश्वर जगताप महीला पोलीस हवालदार

यांनी दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास श्री

विनोद घुगे, पोलीस निरीक्षक दौंड पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शना खाली टी.पी.राठोड, सहा.पोलीस निरीक्षक, दौंड पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

सदर दोन्ही गुन्हयातील आरोपी विरूध्द कोणाची फसवणुकीबाबतची तक्रार असल्यास त्यांनी पोलीस निरीक्षक, श्री विनोद घुगे, दौंड पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क करावा असे आवाहन दौंड पोलिसांनी केले आहे.

Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

5 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

7 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

9 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago