बीड : बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यात असणाऱ्या अर्धमसला गावातील मस्जिदमध्ये स्फोट घडवून आणण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत दोन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून याचा तपास सुरु आहे. टीव्ही 9 या मराठी वृत्तवाहिनीने सर्वात प्रथम याबाबत वृत्त दिले आहे.
मिळत असलेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात असणाऱ्या अर्धमसला या गावात दोन तरुणांनी जिलेटिनच्या सहाय्याने मस्जिदमध्ये स्फोट घडवून आणला. या स्फ़ोटामध्ये मस्जिदमधील भिंतीना भेगा पडल्या असून मस्जिदमधील फरशी फुटली आहे.
या घटनेची माहिती मिळताच बीड चे पोलीस अधीक्षक अर्धमसला गावात पोहोचले असून त्यांनी येथील दोन्ही समाजाला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.