गुळात एक्स्पायर झालेल्या चॉकलेटची भेसळ! अन्न व औषध प्रशासनाची दौंड तालुक्यात मोठी कारवाई

सहकारनामा

पुणे : अन्न व औषध प्रशासनातर्फे मुदतबाह्य चॉकलेट वापरणाऱ्या दौंड तालुक्यातील गुऱ्हाळ चालक उस्मान मयूर याच्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाकडून जप्तीची कारवाई करण्यात आली.

गुऱ्हाळांचे संग्रहित छायाचित्र

अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ हा महाराष्ट्रासह संपूर्ण देशात २०११ पासून लागू झालेला असून सदर कायद्याचा उद्देश जनतेस सुरक्षीत, सकस व निर्मळ अन्न पदार्थ उपलब्ध करून देणे हा आहे. प्रशासनाने मागील कालावधीत केलेल्या कारवाईमध्ये काही गुळ उत्पादक चुकीच्या मार्गाने गुळ उत्पादन करीत असल्याचे निदर्शनास आले होते. याबाबतीत कार्यशाळा घेवून मार्गदर्शन केल्यानंतरही असले चुकीचे प्रकार होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाल्यानंतर राहु (ता. दौंड) येथे ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा >>> रासायनिक खतांची अधिक दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई होणार! जिल्हा कृषी अधीक्षकांचा ‘इशारा’..जाणून घ्या रासायनिक खतांचे सुधारित ‘दर’

राहू येथील गुऱ्हाळवर अचानक धाड टाकली असता तेथे मुदतबाह्य एक्स्पायर झालेले व खाण्यास अयोग्य असलेले चॉकलेट वापरून विनापरवाना गुळ उत्पादन करीत असल्याचे आढळुन आले. त्यामुळे त्यांच्याकडून गुळ व मुदतबाह्य चॉकलेट या पदार्थाचे दोन नमुने घेउन ८९८ किलो असा किंमत २८ हजार ७३६ रुपये व ९९८ किलो मुदतबाह्य चॉकलेट असे एकूण ५२ हजार ६८८ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला.

सदर कार्यवाही सहायक आयुक्त (अन्न) संजय नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सदर कार्यवाही सहायक आयुक्त (अन्न) संजय नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर प्रकरणी तपासणीमध्ये आढळून आलेल्या त्रुटी प्रकरणी नियमानुसार कारवाई घेण्यात येत असून विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर कायद्याअंतर्गत तरतुदीनुसार पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती या विभागाकडून देण्यात आली.

सर्व गुऱ्हाळ चालक- मालकांनी परवाना घेवूनच कायद्याअंतर्गत सर्व तरतुदींचे पालन करुनच गुळ उत्पादन करण्याचे आवाहन सह आयुक्त (अन्न) शिवाजी देसाई यांनी केले आहे.