राष्ट्रीय टॉंग ईल मुडो मार्शल आर्ट स्पर्धेत दौंडच्या विद्यार्थ्यांची उत्कृष्ठ कामगिरी

दौंड : राष्ट्रीय टॉंग ईल मुडो या मार्शल आर्ट खेळाच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा 27 जानेवारी ते 30 जानेवारी या कालावधीत उत्तर प्रदेश येथील मथुरा वृंदावन येथे नुकत्याच पार पडल्या, त्या मध्ये ग्रेट स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी च्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करत दैदिप्यमान अशी कामगिरी केली आणि महाराष्ट्राची मान मार्शल आर्ट क्षेत्रात उंचावली.

या स्पर्धेसाठी विविध राज्यांनी सहभाग घेतला होता त्या मध्ये झारखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, केरळ, आसाम, ओडिसा, अशा 14 राज्यांमधून 530 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता, , महाराष्ट्र तर्फे सहभागी झालेल्या खेळाडू पैकी आपल्या दौंड तालुक्यातील 13 मुलांनी महाराष्ट्रचे नेतृत्व केले.

यामध्ये मध्ये सुवर्ण पदक यशश्री भामरे,
रौप्य पदक आशिष अघमकर, समृध्दी शिंदे,
कांस्य पदक जानवी पाटील, प्रणिती दुधाळ, कल्याणी शितोळे, क्षितिज कुंभार, यश आढाव, अंश यादव, सार्थक गायकवाड, रोहित जगताप, साद शेख, साईराज राजपूत यांनी मिळविले आणि पूर्ण महाराष्ट्र व पुणे जिल्ह्याची मान उंचावली.या सर्व मुलांना प्रवीण होले यांनी मार्गदर्शन केले तसेच गणेश घुगे, समाधान दाने, यश बारवकर यांनी प्रशिक्षण दिले.

या सर्व मुलांना रुपालीताई चाकणकर यांनी पत्रा द्वारे शुभेच्छा दिल्या तसेच प्रियांका दाने, रुपाली टेंगेल, किरण क्षिररसागर (महाराष्ट्र पोलिस) यांनी त्यांचे अभिनंदन केले.