Categories: सांगली

सांगली जिल्ह्यात ‘झिका’ ची इंट्री, मिरज मधील एकजण ‘झिका’ पॉझिटिव्ह

सुधीर गोखले

सांगली : कोरोनानंतर ज्या विषाणूची दहशत संपूर्ण जगाने घेतली त्या ‘झिका विषाणू ने सांगली जिल्ह्यात दस्तक दिली आहे. सांगलीच्या मिरजमध्ये शास्त्री चौक परिसरात रहाणाऱ्या एका मुलीच्या रक्ताचा नमुना चाचणीसाठी पाठवण्यात आला होता तो ‘पॉझिटिव्ह’ असल्याचे निदान झाले आहे. मात्र या मुलीची तब्येत चांगली असून घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

ताप, सर्दी, खोकला या लक्षणांमुळे नऊ सप्टेंबर रोजी या मुलीला मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिच्यावर उपचार करून तिला बरेही केले होते. त्यावेळी चिकनगुनिया आणि डेंग्यू चाचणी निगेटिव्ह आली पण तिच्या रक्ताचा नमुना पुणे येथील एन.आय.व्ही कडे ‘झिका’ च्या तपासणीसाठी पाठवण्यात आला होता तो अहवाल मिरज शासकीय रुग्णालयाला प्राप्त झाला असून तो ‘पॉझिटिव्ह’ असल्याचे समोर आले.

खबरदारी म्हणून या मुलीच्या आजूबाजूच्या घरांमध्येही हि चाचणी घेतली गेली मात्र अद्याप सध्यातरी कोणालाही या विषाणूची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र कोणत्याही प्रकारे रुग्णांनी अथवा रुग्णाच्या नातेवाईकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे. मात्र या घटनेमुळे सांगली जिल्ह्यात वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे हा ‘झिका’
‘झिंका’ हा विषाणू एडिस या डासांच्या प्रजातींमुळे निर्माण होतो. या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीचे रक्त हा डास शोषून घेतो व तो हा विषाणू सर्वत्र पसरवतो यासाठी आपल्या आजूबाजूला नेहमी स्वच्छता ठेवावी पाणी साठा जास्त काळापर्यंत ठेऊ नये तसेच वेळोवेळी प्रशासनाकडून रोग प्रतिबंधक औषध फवारणी करून घेत जावी.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

52 मि. ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

21 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago