महाराष्ट्र

राज्याच्या राजकारणात ‘केडगाव’ची एन्ट्री, म्हणून ‘ओबीसी फॅक्टर’ला सुरुवात

पुणे : दौंड तालूक्यातील केडगाव विकास आघाडी  [ओबीसी पर्व] ची एन्ट्री राज्याच्या राजकारणात झाल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतीच एका वृत्त वाहिनीने मंत्री छगन भुजबळ यांची मुलाखत घेतली त्यवेळी  छगन भुजबळ यांनी दौंड तालुक्यातील केडगावचा संदर्भ देत येथे १३ हजार ५०० मतदान असलेल्या ग्रामपंचायत मध्ये एकच पर्व, ओबीसी सर्व हा फॅक्टर  चालल्याचे  सांगितले आहे. त्तुयामुळे तुम्म्हीही राजकीय दृष्ट्या ओबीसींना टार्गेट कराल तर ओबीसी पर्व तुम्हाला टार्गेट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा जणू संदेशच त्यांनी यावेळी दिला आहे.

सध्या राज्यामध्ये मराठा आरक्षणावरून ओबीसी आणि मराठा आंदोलक यांच्यामध्ये वाद सुरु झाल्याचे पहायला मिळत आहे. मराठा समाजाला जरूर आरक्त्याषण द्चायावे मात्र ते ओबीसी कोठ्यातून देऊ नये असे ओबीसी समाजाची मागणी आहे. आणि याचा  परिणाम हा संपूर्ण राज्यातील राजकारणावर होताना दिसत आहे. राज्यात  मराठा विरुद्ध  ओबीसी असा नवा वाद सुरु झाला असल्याने याचा परिणाम विविध निवडणुकांमध्ये पहायला मिळत आहे. ओबीसी जागेंवर मराठा समाजाचे कुणबी मराठा उभे राहू लागल्याने आता ओपन जागेवर ओबीसी सुद्धा आपले उमेदवार उभे करू लागले आहेत. असाच काहीसा प्रकार  दौंड तालुक्यातील सर्वाधिक मतदान असणाऱ्या केडगाव ग्रामपंचायत निवडणुकीत झाला आहे. येथे ओबीसी पर्व [केडगाव विकास आघाडी] च्या सरपंचपदाच्या उमेदवार  पूनम  गौरव बारवकर ह्या मोठ्या मताधिक्क्याने निवडून आल्या आहेत. त्यामुळे  राज्यातील आरक्षण आणि विरोधाचे लोन आता  गावपातळीवर पोहोचल्याचे दिसत आहे. केडगाव ग्मरामपंचायत निवडणुकीमध्ये  मतदारांनी कुल-थोरात यांना नाकारत  तिसरी  आघाडी  [ओबीसी  पर्व] च्या  उमेदवाराला येथे निवडून दिले आहे.

मंत्री छगन भुजबळ यांनी हाच धागा पकडून या मुलाखतीमध्ये ओबीसी एकजूट हि राजकीय परिवर्तन कशी करू शकते याचे उदाहरण दिले आहे. या एका निकालामुळे संपूर्ण दौंड तालुक्यातील राजकीय गोटामध्ये खळबळ माजली असून हाच फॅक्टर जर विधानसभेला दौंड तालुक्यात चालला तर मात्र पारंपारिक प्रतिस्पर्धी असणाऱ्या कुल-थोरात यांना आव्हान निर्माण करणारा ठरू शकतो. सध्यातरी केडगाव पुरता मर्यादित असणारा फॅक्टर  येणाऱ्या जिल्हा परिषद आणि नगरपरिषद निवडणुकीला आपले उमेदवार उभे करून कुल-थोरात गटासमोर आव्हान उभे करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

3 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago