Categories: क्राईम

खा.सुप्रिया सुळे यांच्या विश्वासाला मोठा तडा..! दौंड तालुका खरेदी विक्री संघात 40 लाख 86 हजारांचा अपहार, खा.सुळे यांनी दिलेल्या निधीचाही समावेश

दौंड : दौंड तालुक्यातील एक नावाजलेली संस्था म्हणून जीच्याकडे पाहिले जात होते त्या दौंड तालुका सहकारी खरेदी विक्री संघात तब्बल 40 लाख 86 रुपयांचा अपहार झाल्याचे समोर येत असून याबाबतची फिर्याद लेखा परीक्षक राजेश भुजबळ यांनी दिली आहे. भुजबळ यांच्या तक्रारीवरून यवत पोलीस ठाण्यात 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दौंड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे तत्कालीन अध्यक्ष 1) भानुदास नेवसे, 2) लक्ष्मण दिवेकर, मुख्य व्यवस्थापक 3) मोहन शितोळे, डेपो व्यवस्थापक 4) राजेंद्र थोरात, 5) गणेश थोरात, 6) नाना कोकरे, 7) नंदकुमार विश्वासे, 8) आबा कुल, 9) संदीप कुल, 10) संदीप लडकत, 11) योगेश चौधरी, 12) शिपाई योगेश चांदगुडे या बारा जणांनी संगनमत करून खरेदी विक्री संघात अपहार करत फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौंड तालुका खरेदी विक्री संघाच्या नवीन इमारतीसाठी खा.सुप्रिया सुळे यांनी विश्वासाने निधी दिला होता. 2018 रोजी येथील सभागृहाच्या उदघाटनावेळी खा.सुप्रिया सुळे यांनी या संघाचा गुणगौरव केला होता आणि संघाचे कामकाज चांगले चालवल्याबद्दल प्रशंशाही केली होती. मात्र त्यांनी दिलेल्या सभागृह बांधकाम निधीतही अपहार करण्यात आल्याची माहिती समोर आल्याने खासदार सुळे यांनी टाकलेल्या विश्वासासही कुठेतरी तडा गेल्याचे बोललेले जात आहे. या संघावर दौंडचे माजी आमदार आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्या गटाची अनेक वर्षांपासून सत्ता आहे. लेखा परीक्षक भुजबळ यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये या संघाचे माजी अध्यक्ष भानुदास नेवसे व व्यवस्थापक शितोळे यांनी त्यांच्या काळात महाराष्ट्र बायो फर्टिलायझर कंपनीकडून 35 लाख रुपयांची खते व औषधे घेऊन साठ्यामध्ये अफरातफर करून 5 लाख 80 हजारांचा अपहार केला तसेच लक्ष्मण दिवेकर उर्फ एल.पी. तात्या हे अध्यक्ष असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी केडगाव येथे सभागृह बांधकामासाठी दिलेल्या निधीमध्ये 7 लाख 82 हजार रुपयांचा अपहार केला तर कडेठाण येथील डेपो व्यवस्थापक योगेश चौधरी याने 23 लाख रुपयांचा अपहार करून जादा दराने खते विकली. जादा दराने खते विकून जास्तीच्या 10 लाख 29 हजार रुपयांचा अपहार करून गरीब व सामान्य शेतकऱ्यांची संगनमताने आर्थिक पिळवणूक केली आहे. दहिटणे खत डेपोमध्ये गणेश थोरात, संदीप लडकत, योगेश चांदगुडे, संदीप कुल यांनी संगनमताने 3 लाख 72 हजारांचा अपहार केला. दहिटणे डेपोतील संदीप कुल यांनी 1 लाख 20 हजार रुपयांचा अपहार केला. तसेच वरील 12 इसमांनी वयक्तिक आर्थिक फायदा होण्यासाठी संगनमत करून व्यवस्थापन समिती व सभासद यांची 40 लाख 86 हजार रुपयांची फसवणूक व अफरातफर केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत यवत चे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक केशव वाबळे तपास करीत आहेत.

Team Sahkarnama

Recent Posts

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

3 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

23 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago