|सहकारनामा|
दौंड : वाढीव वीज बिल व सक्तीने वसुली करण्यासाठी वीजपुरवठा खंडित करून नागरिकांची गळचेपी करणाऱ्या राज्य सरकार आणि विद्युत वितरण कंपनीच्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडी व युवा आघाडीच्या वतीने सरकारला _कंदील भेट आंदोलन करण्यात आले.
एकीकडे जनता लॉकडाऊन व कोरोनाच्या महाभयंकर परिस्थितीमुळे संकटात सापडली आहे, दुसरीकडे महागाई गगनाला भिडली आहे. तरी _वीज बिल माफ करण्याऐवजी सरकार वीजपुरवठा खंडित करून शेतकरी, दुकानदार सर्वसामान्य नागरिकांची गळचेपीच करत आहे, याकरिता सदरचे आंदोलन करण्यात आले. यावेळी पक्षाच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन महावितरण कंपनी व दौंड पोलीस स्टेशनला देण्यात आले.
दोनशे युनिट पर्यंतचे वीजबिल माफ करण्यात यावे, मीटर भाडे कपात करण्यात यावे, विजेचा स्थिर आकार व प्राथमिक भाव प्रमाणे दर आकारणी करावी,
सक्ती ची वीज बिल वसुली तात्काळ थांबवावी, ज्या ग्राहकांनी वीज बिल मार्च 2020 पासून भरले त्याचे साठी अभय योजना तयार करावी व पुढील वर्षभरात वीजबिल निल पाठवावे, ३० दिवसानंतर रिडींग घेणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. महावितरणचे आधिकारी वैभव पाटिल, दौंड पोलिस स्टेशनचे पो. उपनिरीक्षक पालवे यांनी निवेदन स्वीकारले.
या प्रसंगी बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष गोरक्ष बारवकर, ता. अध्यक्ष गोरख फुलारी, युवा आघाडीचे लखन जाधव, इरफान सय्यद, मनोहर कोकरे, महिला आघाडीच्या पुष्पा बनकर, सुनिता आडसुळ, रविना दुर्गूडे, पुनम जाधव, पुजा शिंदे, छाया भोसले, पल्लवी जगताप, रामचंद्र भागवत, सागर भागवत अमोल भोपाळ, शेतकरी संघटनेचे राजाभाऊ कदम बहुजन क्रांती मोर्चाचे निलेश बनकर, अशोक मोरे, डॉ. दत्तात्रय जगताप उपस्थित होते.