मुंबई : राज्यातील मनपा, झेड.पी. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणार असून त्या आता दिवाळीतच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारने प्रशासकीय अधिकाऱ्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याची तयारी सुरु केल्याने या निवडणुका आता दिवाळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यातील झेड.पी. मनपा च्या निवडणुकांना अगोदरच उशीर झाला असताना आता पुन्हा एकदा प्रशाकीय अधिकाऱ्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. तीन महिने पूर्ण झाल्यानंतर पुढे पावसाळा सुरु होणार आहे. त्यामुळे आता या निवडणुका हिवाळ्यात म्हणजेच दिवाळीतच होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
पराभवाच्या भीतीने निवडणुका लांबणीवर – अजित पवारांची टिका
पराभवाच्या भीतीने शिंदे, फडणवीस सरकार निवडणुका जाहीर करत नाहीत असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. नुकत्याच काही निवडणुकांमध्ये जनतेने भाजप, शिंदे गटाला त्यांची जागा दाखवली आहे त्यामुळे या वातावरणात निवडणुका लागल्या तर निकाल काय लागेल हे त्यांना माहित आहे त्यामुळे ते या निवडणुका अजून लांबवत असल्याचा आरोप अजित पवार यांनी एका सभेत केला आहे.