पुणे जिल्हा ग्रामीण ‛समन्वयक’ पदी आमदार ‛राहुल कुल’ यांची निवड

पुणे : दौंडचे आमदार राहुल कुल यांची पुणे जिल्हा ग्रामीण ‛समन्वयक’ पदी निवड करण्यात आली आहे. याबाबत आमदार राहुल कुल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार राहुल कुल यांची जिल्हा समन्वयक म्हणून दि.4 रोजी निवड करण्यात आली आहे . भारतीय जनता पक्षामध्ये पूर्वी पुणे जिल्हा ग्रामीण हा संपूर्ण जिल्हा होता. यावर्षीपासून यामध्ये बदल करत दक्षिण व उत्तर असे दोन जिल्हे निर्माण केले आहेत.त्यामुळे पुणे जिल्हा ग्रामीणला दोन जिल्हाध्यक्षांची नेमणुक केली आहे. यामुळे या दोन्हीही ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षामध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी ही आमदार राहुल कुल यांच्याकडे देण्यात आली आहे . यावरून एक प्रकारे आमदार राहुल कुल यांच्याकडे अप्रत्यक्षरीत्या संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

आमदार राहुल कुल यांची पुणे जिल्हा ग्रामीण समन्वयक पदी (पुणे उत्तर व पुणे दक्षिण ) या विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. कुल यांच्या या नियुक्तीने दौंड तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे.

आमदार राहुल कुल यांच्यावर या अगोदर बारामती लोकसभा निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्यावर पुणे जिल्हा समन्वयक पदाचीही जबाबदारी देण्यात आल्याने हा पक्षाने आपल्यावर मोठा विश्वास दाखवला असल्याचे मनोगत आमदार कुल यांनी व्यक्त केले आहे. तसेच या नियुक्तीबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील व सर्व पक्षश्रेष्ठींचे त्यांनी आभार मानले आहेत.