मुंबई : महाराष्ट्र विधीमंडळ हक्कभंग समितीच्या अध्यक्षपदी आमदार राहुल कुल यांची निवड झाल्याबद्दल विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी त्यांचा आज सत्कार करून अभिनंदन केले.
माजी आमदार श्रीमती रंजना कुल यांनी विधानसभा सदस्य म्हणून काम केले, कै. सुभाष कुल यांनी विधानसभा सदस्य व विधिमंडळाच्या आश्वासन समितीचे अध्यक्ष पदी काम केले त्यांच्या आशीर्वादाने व दौंड तालुक्यातील जनतेने सलग दुसऱ्यांदा आमदारपदी निवडून दिल्याने येथे काम करण्याची संधी मिळाली असल्याची भावना यावेळी कूल यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र विधीमंडळ हक्कभंग समितीच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल विधानसभेचे अध्यक्ष अ़ॅड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आमदार राहुल कुल यांनी आभार मानले.