Categories: क्राईम

दौंड मधील जेष्ठ दांपत्याला दमबाजी करून जमीन लाटण्याचा प्रयत्न

अख्तर काझी

दौंड : दौंड तालुक्यातील बेटवाडी येथे सेवा निवृत्त झालेल्या जेष्ठ दांपत्याची स्वतःच्या मालकीची जमीन आहे. या जमिनीस असलेले सिमेंटचे खांब व तारांचे कंपाउंड तोडून ती जमीन बळकाविण्याचा प्रयत्न होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आशा किसन कोंडलकर (वय 55,रा. दत्तनगर, गोपाळवाडी) यांनी दौंड पोलिसात फिर्याद दिली आहे. दौंड पोलिसांनी बाळासाहेब कुशाबा निवगुणे(रा. बेटवाडी, दौंड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार फिर्यादी व त्यांचे पती किसन कोंडलकर हे दोघे दि. 15 एप्रिल2023 रोजी बेटवाडी येथील आपल्या मालकीच्या असलेल्या जमिनीची पाहणी करण्यासाठी गेले होते. तेव्हा जमिनीस असलेले सिमेंटचे खांब (120) व तारांचे असलेले कंपाऊंड चोरीस गेल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे त्यांनी जमिनीचे जुने मालक ओमप्रकाश यादव यांना त्या ठिकाणी बोलावून घेतले व झालेला प्रकार सांगितला.

यावेळी जमिनीची पुन्हा पाहणी करीत असताना त्यांना जेसीबी व ट्रॅक्टरच्या चाकांचे निशाण दिसून आले, व जमीन मालकाच्या नावाचा असलेला बोर्डही गायब असल्याचे त्यांना दिसले. फिर्यादी यांनी त्यांच्या जमिनी शेजारी असलेले जमीन मालक बाळासाहेब निवगुणे यांच्याकडे जाऊन चौकशी केली असता, तुमच्या जमिनीवर असलेले कंपाउंड मीच काढलेले आहे, मला माझी वाटणी आलेली आहे, तुम्हाला काय करायचे ते करा आणि तुम्ही येथून निघून जा असे धमकाविले.

वाद होऊन भांडणे होऊ नये म्हणून फिर्यादी व त्यांचे पती तेथून निघून गेले. वाद सामंजस्याने मिटेल व निवगुणे आपल्या जमिनीस पुन्हा कंपाऊंड लावून देतील असा फिर्यादी यांचा समज झाल्याने त्यांनी त्यावेळी पोलिसांकडे तक्रार केली नाही. परंतु आजपर्यंत निवगुणे यांनी फिर्यादी यांचे नुकसान भरून दिले नाही व मी तुमचे नुकसान देणार नाही तुम्हाला काय करायचे ते करा अशी भाषा वापरल्याने निवगुणे यांच्या विरोधात दौंड पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. दमबाजी करून ज्येष्ठ दांपत्याची जमीन लाटण्याचा हा प्रयत्न आहे की काय अशी शंका नागरिकांकडून उपस्थित केली जात आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

19 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago