Categories: क्राईम

काय सांगता… 2 कोटींची जमिन फक्त 20 लाखात! दौंड मधील कॅन्सर पीडित वृद्ध व त्यांच्या कुटुंबीयांची बांधकाम व्यावसायिकाकडून मोठी फसवणूक

अख्तर काझी

दौंड : खाजगी कंपनीतून निवृत्त झालेल्या कॅन्सर पीडित वृद्धाची दौंड मधील एका बांधकाम व्यावसायिकाने तब्बल 1 कोटी 80 लाख रुपयांची फसवणूक केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मोजेस डॅनियल यादव (रा. पंचवटी अपार्टमेंट, बंगला साईड दौंड) यांनी फसवणूक झाल्या प्रकरणी फिर्याद दिली आहे. श्रीराम उद्धवराव मांढरे (रा. शिवगौरी अपार्टमेंट, दीपमळा, दौंड) असे गुन्हा दाखल झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, बांधकाम व्यावसायिक आरोपीने, फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबीयांची जमीन खरेदी व्यवहारात 1 कोटी 79 लाख 50 हजार रु. ची फसवणूक केली आहे. फिर्यादी कॅन्सर ग्रस्त आहेत, त्यामुळे त्यांना उपचारासाठी मोठ्या पैशाची गरज होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्यासह त्यांची आई, भाऊ व बहिणी यांच्या नावे असलेल्या शहरातील वडिलोपार्जित 38 गुंठे जमिनीचे व्यवहार करण्याचे हक्क (पॉवर ऑफ ऍटर्नि) स्वतःकडे घेतले होते. सर्वांच्या संमतीने ती जमीन गहाण ठेवून किंवा विक्री करून पैसे जमविण्याचा त्यांचा विचार होता.

दरम्यान फिर्यादी पुणे येथील खाजगी दवाखान्यामध्ये उपचार घेत असताना आरोपीने त्यांची तेथे जाऊन भेट घेतली व तुम्हाला पैशाची गरज आहे, तुमच्या उपचारासाठी मोठा खर्च आहे म्हणून मी तुमची जमीन विकत घेतो. माझ्या बँक खात्यात 4-5 कोटी रुपये शिल्लक आहेत, मी 15 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमच्या जमिनीचे बाजारभावाप्रमाणे 2 कोटी रुपये देऊ शकतो. मी दौंडचाच आहे, तुमची फसवणूक करणार नाही असे सांगून विश्वास संपादन केला. फिर्यादी उपचार घेऊन पुन्हा दौंडला येताच आरोपी मांढरे यांनी फिर्यादी यांची भेट घेतली. त्यावेळेस त्यांच्यासोबत 3-4 इसमही होते. आपल्या सोबतच जमिनीचा व्यवहार करावा म्हणून त्याने फिर्यादी यांना राजी केले.

फिर्यादी यांनी आपल्या घरातील सदस्यांशी चर्चा करून आपली शहरात असणारी 35 गुंठे जमीन आरोपीस 2 कोटी रुपयांना विकण्याचा निर्णय घेतला. दि.18 नोव्हेंबर 2014 रोजी फिर्यादी यांनी आरोपीस जमिनीची खरेदी दिली. त्यावेळी आरोपी याने फिर्यादी व आई, भाऊ, बहीण यांच्या नावे जमिनीचा मोबदला म्हणून स्वतःच्या बँक खात्याचे 2 कोटी रु. साठीचे 8 स्वतंत्र धनादेश दिले. या धनादेशापैकी 20 लाख 50 हजार रु. चे असलेले 2 धनादेशच वटून फिर्यादी यांना पैसे मिळाले. इतर सदस्यांना दिलेले 1 कोटी 79 लाख 50 हजार रु. चे 6 धनादेश वटलेच नाहीत. आरोपी याने आपल्या बंद खात्याचे धनादेश देऊन फिर्यादी यांची फसवणूक केली. तर आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात आल्याने फिर्यादी यांनी दौंड पोलिसांकडे तक्रार केली. दौंड पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक श्रीराम मांढरे विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे असून पुढील तपास सुरु आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

14 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago