| सहकारनामा |
पुणे : मुस्लिम धर्मियांचा पवित्र महिना आणि त्याचा पवित्र सण रमजान ईद निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार साहेब, तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खा.सुप्रिया सुळे यांनी मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
खासदार शरद पवार यांनी शुभेच्छा देताना सामाजिक ऐक्य, सलोखा आणि सद्भावनेचे प्रतिक असणाऱ्या रमज़ान ईदच्या सणानिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर घरातच हर्षित मनोवृत्तीने व साधेपणाने ईद साजरी करत आपल्या समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचा परिचय देऊया असा संदेशही दिला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देताना.. राज्यातील जनतेला ‘रमजान ईद’च्या शुभेच्छा यंदाची ‘ईद’ सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो अशा शुभेच्छा देऊन कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी प्रतिबंधक नियमांचं काटेकोर पालन करावं. स्वत:ला, कुटुंबाला, समाजाला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्याचा निर्धार करावा,असं आवाहन केले.
तर बारामती विभागाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुभेच्छा देताना ही ईद आपल्या आयुष्यात निरोगी व आनंदी जीवनाचे दान घेऊन यावी अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी मुस्लिम बांधवांकडून ईदगाह मैदानावर न जाता घरीच ईद ची नमाज अदा केली गेली आहे.