‛ईद’-‛एकादशी’ एकाच दिवशी | ‛ईद’ ला ‛कुर्बानी’ न करण्याचा ‛पारगाव’ येथील मुस्लिम बांधवांचा ‛निर्णय’

दौंड : यंदा आषाढी एकादशी दिवशीच बकरी ईद म्हणजेच ईद उल अजहा हा सण येत आहे. अशा परिस्थितीत दौंड तालुक्यातील पारगाव येथे हिंदू-मुस्लिम एकतेचे अनोखे उदाहरण पाहायला मिळालं आहे. समीर शेख, राज शेख, कमरुद्दीन शेख, अजीज मु. शेख, महंमद शेख, चांद मणियार, दस्थगिर पठाण, शहाबुद्दीन शेख, सोहेल पठाण, बादशहा पठाण, रफिक सय्यद, अजीज समशेर शेख, फकीर पठाण या पारगाव येथील मुस्लिम बांधवांनी बकरी ईदला कुर्बानी न करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या पंढरपूरच्या विठ्ठलाचा पालखी सोहळा सुरू आहे. पुढच्या आठवड्यातआषाढी एकादशीआहे. मात्र यंदा आषाढी एकादशी दिवशीच ईद उल अजहा म्हणजे बकरी ईद साजरी होणार आहे आहे. त्यामुळे येथील मुस्लिम बांधवांनी एकदशी दिवशी हिंदू बांधवांच्या भावना लक्षात घेत वरील निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे हिंदू-मुस्लिम बांधवांच्या एकतेचे पुन्हा एकदा उदाहरण पाहायला मिळाले आहे.

बकरी ईदला कुर्बानी न देण्याचा निर्णय पारगाव परिसरातील मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. त्यामुळे तालुक्यातील इतर भागातील मुस्लीम बांधवांनीही त्याचे अनुकरण करावे असे आवाहन या मुस्लिम बांधवांनी केले आहे. पारगाव च्या मुस्लिम बांधवांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे.