मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस चे जेष्ठ नेते, प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या घरावर आज पहाटेच्या सुमारास ED ने छापेमारी करून त्यांच्यावर एक तास प्रश्नांचा भडीमार केला आहे. यानंतर त्यांना ED च्या कार्यालयात नेण्यात आले आहे.
सध्या मलिक हे ईडी कार्यालयात असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
काही दिवसांपूर्वीच नवाब मलिक यांनी ‘माझ्या घरी लवकरच सरकारी पाहुणे येणार! असे ट्वीट करत आपण समीर वानखेडे प्रकरणात लक्ष घातल्याने त्यांना लक्ष करण्यात येत असल्याचे म्हटले होते.
सत्तेचा दुरुपयोग करून केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा पाठिमागे लावण्याचा प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरु असून ईडी, सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरूपयोग करून विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप नवाब मलिक यांनी वेळोवेळी केला आहे. यामध्ये केंद्र सरकार सुडबुद्धीनं कारवाई करत असून त्यांनी जेष्ठ नेते शरद पवार, तामिळनाडूतील DMK चे जेष्ठ नेते,तसेच विविध राज्यांतील नेत्यांना सरकारी यंत्रणाद्वारे त्रास दिला दिला जात असल्याचे म्हटले होते. मात्र महाविकास आघाडी सरकारवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. सरकार केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपसमोर झुकणार नाही असे सांगत नवाब मलिक यांनी राज्यातील भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला होता.