Categories: सांगली

आता सांगलीतही पोहचली ईडी ED, सांगलीतील बडे व्यावसायिक पारेख बंधूंच्या घरावर ईडी चा छापा

सुधीर गोखले

सांगली : सांगली शहरात आज सकाळी ईडीची दोन पथकं दाखल झाली आहेत. ही पथकं शिवाजीनगरमधील सुरेश आणि दिनेश पारेख बंधू यांच्या दोन बंगल्यात चौकशी करत आहेत. तिथे ईडीचे अधिकारी काही जणांची चौकशी करत आहेत. सध्या कोणताही तपशील माध्यमांना देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे.
पारेख बंधूंचा इलेक्ट्रिकल्सचा मोठा व्यवसाय
पारेख हे सांगलीतील बडे व्यावसायिक आहेत. या पारेख बंधूंचा इलेक्ट्रिकलचा मोठा व्यवसाय आहे. सांगली शहरातील गणपती पेठ भागात त्यांची इलेक्ट्रिकल्सची दुकान आहेत. त्यांचा शिवाजीनगर परिसरात बंगला आहे. या बंगल्यात आज ईडीचे पथक पहाटेच्या सुमारास चौकशीसाठी आले. या बंगल्याबाहेर सीआरएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
बँकांमध्ये जाऊन पारेख बंधूंशी संबंधित खात्याची चौकशी
आर्थिक आणि व्यवसायातील अनियमितता या संशयावरुन ही चौकशी सुरु असल्याचे समजतं. पारेख बंधूंच्या बंगल्यामध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांकडून केल्या जात असलेल्या चौकशीबद्दल स्थानिक पोलिसांनी सुद्धा येऊन चौकशी करुन माहिती घेतली आहे. पारेख बंधूंच्या दोन बंगल्यामध्ये चौकशी करण्याबरोबरच ईडीच्या काही अधिकाऱ्यांनी काही बँकांमध्ये जाऊन पारेख बंधूंशी संबंधित खात्याची चौकशी देखील करायला सुरुवात केली आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

11 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago