ED कडून अटक होताच नवाब मलिकांनी दिली ‘घोषणा’, राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात

मुंबई : तब्बल आठ तासाच्या
चौकशीनंतर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना आज दुपारी अटक करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ही अटक करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. नवाब मलिक यांना अटक करून घेऊन जात असताना नवाब मलिक यांनी जमलेल्या जन समुदायासमोर हात उंच करून ‘लडेंगे’… ‘लडेंगे’… अशी घोषणा दिली. त्यामुळे आता राजकीय वातावरण चांगलेच तापत चालले असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या घरी आज पहाटे ईडीकडून छापेमारी करण्यात आली. यावेळी नवाब मलिक यांची इडी कार्यालयात नेऊन चौकशी सुरू करण्यात आली. तब्बल आठ तास चौकशी झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. ही बातमी समजताच राज्यात एकच खळबळ उडाली.
नवाब मलिक यांच्या अटकेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून
राष्ट्रवादी काँग्रेसने हे सुडाचे राजकारण असल्याचे म्हटले आहे. तर काँग्रेसचे नाना पटोले यांनी केंद्र सरकार विरोधात बोलल्यानेच नवाब मलिकांना टार्गेट करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

नवाब मलिकांच्या अटकेनंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून अनिल देशमुख यांच्यानंतर मंत्रीपदावर असताना
अटक झालेले नवाब मलिक हे दुसरे मंत्री आहेत हे विशेष.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

14 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago