आता जिल्ह्यात किंवा जिल्ह्याबाहेर फिरण्यासाठी ‛ई-पास’ (E Pass) आवश्यक, ई- पास साठी असा करा ‛अप्लाय’



| सहकारनामा |

पुणे : जिल्ह्यात आणि जिल्ह्याच्या बाहेर फिरण्यासाठी आता ई-पास (E Pass) काढणे आवश्यक करण्यात आला आहे. कोरोना व्हायरसने राज्यात धुमाकूळ घातला असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आता प्रशासनाने विविध उपाययोजनांसह जिल्ह्यात आणि जिल्ह्याच्या बाहेर प्रवासास बंदी केली असून अत्यावश्यक कारणासाठी प्रवास करावा लागल्यास त्यासाठी आता ई-पास (E Pass) ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आता लोकांना अत्यावश्यक आणि अति महत्वाच्या कारणांसाठी प्रवास करण्याची गरज निर्माण झाल्यास त्यांना ई- पास (E Pass) काढावा लागणार आहे.

■ असा काढा ई- पास E (Pass)

■ ज्यांना जिल्ह्यांतर्गत किंवा जिल्ह्याच्या बाहेर प्रवास कारायचा असेल त्यांनी ई- पास काढण्यासाठी या  

ई पास (E Pass) काढण्यासाठी या लिंकवर क्लिक करा   लिंकवर क्लिक करा.

★ साईट ओपन झाल्यानंतर ‘apply for pass here’ यावर क्लिक करावे.

★ यानंतर ज्या ठिकाणी प्रवास करायचा आहे तो जिल्हा निवडावा

★ यात जी कागदपत्रे तुम्हाला सबमिट करायला लावली आहेत ती जोडावी व प्रवासाचे कारण नमूद करावे

★ हि सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक  टोकन आयडी दिला जाईल. व यातील लिंकच्या आधारे तुम्हाला पास ची चालू स्थिती तपासता येईल

★ वरील संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर आणि शासकीय कार्यालयाकडून तुमच्या पासची पडताळणी होऊन त्याला रीतसर परवानगी मिळाल्यानंतर तुम्हाला दिला गेलेला टोकन आयडी वापरुन ई- पास ला डाऊनलोड करुन आपल्याकडे सेव्ह करू शकता.

★ तुम्ही जिल्ह्यांतर्गत किंवा बाहेर प्रवास करत असताना हा ई पास आपल्या जवळ ठेवावा.

★ ई पास मिळाल्यानंतर तुम्हाला या ई पास मध्ये तुमची माहिती, वाहन नंबर, पासची एक्सपायरी डेट वैधता कालावधी आणि क्यूआर कोड दिलेला असेल.

■ कोणत्या कारणासाठी ई पास (E Pass) चा वापर करावा

★ घरातील, नात्यातील किंवा जवळील व्यक्तीचा विवाहसोहळा, अंत्यविधी आणि दवाखाण्यासंदर्भातील काम यासाठी हा ई-पास मिळवता येऊ शकतो.

★ अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांसाठी आंतरराज्यीय आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी ई- पासची आवश्यकता नाही.

★ कोणतीही एक व्यक्ती किंवा अनेक व्यक्ती या पाससाठी अर्ज करु शकतात.

★ ज्या व्यक्तींना ई पास मिळण्यात काही अडचणी येत असतील त्यांनी नजीकच्या पोलीस स्टेशनला भेट द्यावी.