Categories: Previos News

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठे बदल – ’दौंड’, ‛भोर’, ‛जुन्नर’, ‛खेड’ विभागांचे हे आहेत नवीन ‛DYSP’



मुंबई : सहकारनामा ऑनलाइन

राज्यपोलीस सेवेत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पारित करण्यात आले असून राज्यातील 119 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या गृहविभागामार्फत करण्यात आल्या आहेत. 

या बदल्यांमध्ये विदर्भ भागातील अनेक अधिकाऱ्यांची पश्चिम महाराष्ट्रात नियुक्ती करण्यात आली आहे.

त्याचे प्रमाणे पुणे ग्रामीण पोलीस दलात ही मोठे बदल झाले असून धनंजय पाटील (भोर), राहुल धस (दौंड), मंदार जवळे (जुन्नर), तर अनिल लंबाते (खेड) यांची उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून संबंधित ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. 

कोरोना महामारीने डोके वर काढल्यानंतर  राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या होत्या. त्यामुळे लॉकडाऊन अनलॉककडे वाटचाल सुरू झाल्यानंतर गृहखात्या मार्फत 30 सप्टेंबर रोजी बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. 

105 अधिकाऱ्याना नियुक्ती ची ठिकाण देण्यात आली असून. 14 अधिकाऱ्यांचे नियुक्तीचे आदेश स्वतंत्र काढण्यात येणार असल्याचे गृहविभागाने स्पष्ट केले आहे.

Sahkarnama

Recent Posts

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

6 तास ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

1 दिवस ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

3 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

3 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

3 दिवस ago