दौंड’च्या शिरपेचात मानाचा तुरा, दौंड तालुक्याच्या या छोट्या गावातील कन्या बनली ‛DYSP’



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (पूजा भोंडवे)

दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा येथील आदर्श शिक्षक राजेंद्र पवार सर यांची  कन्या कु.आरती राजेंद्र पवार यांची पोलीस उपअधीक्षक (DYSP) पदी निवड झाली आहे.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्यांना हे यश मिळाले आहे. त्यांनी पदवीचे  शिक्षण बारामतीमधील व्हीपी कॉलेजमधून पूर्ण केले आहे. एका छोट्या गावातील मुलगी केवळ आपल्या कर्तृत्वाने इतक्या मोठ्या पदावर विराजमान झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.