शिक्रापूर : सहकारनामा ऑनलाईन (शेरखान शेख)
शिक्रापूर ता. शिरूर येथील एका हॉटेल मध्ये बेकायदेशीरपणे होत असलेल्या दारू विक्रीवर थेट दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी आयपीएस ऐश्वर्या शर्मा यांच्या पथकाने कारवाई करत दारू जप्त करून दारू विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे.
शिक्रापूर ता. शिरूर पोलीस स्टेशन येथे दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा या आल्या असताना शिक्रापूर येथील चाकण रोड जवळील हॉटेल साईकरुणा येथे बेकायदेशीरपणे विनापरवाना देशी दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाली, त्यांनतर दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश चव्हाण, महेंद्र शिंदे, निखील रावडे, दौंड कार्यालयातील नंदकुमार केकाण, ओव्हाळ यांसह आदींनी सदर साई करुणा हॉटेल येथे जाऊन छापा टाकला त्या हॉटेलमध्ये बसलेला इसम कावराबावरा होऊन पळून जाऊ लागला त्यावेळी पोलिसांनी त्याला पकडले आणि त्याने हॉटेलमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या पाच हजार रुपये किमतीच्या दारूच्या बासष्ट बाटल्या जप्त केल्या आहे, याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई निखील भिवाजी रावडे रा. शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी रामू बकाराम लांजेवार वय ५० वर्षे रा. शिक्रापूर चाकणरोड ता. शिरूर जि. पुणे याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश चव्हाण हे करत आहे.