दौंड : गेल्या नऊ वर्षांत केंद्रसरकारने चांगले काम केले आहे त्यामुळे त्यांना निवडणुकांत यश आले असून 9 वर्षांत सरकारमध्ये कुठलेही भ्रष्टाचाराची प्रकरणे किंवा तसे आरोप झाले नाहीत ही स्वच्छ कारभाराची पावती आहे असे मत दौंड चे आमदार राहुल कुल यांनी मोदी @9 जनसंपर्क अभियानांतर्गत कार्यक्रमात व्यक्त केले.
चौफुला येथील श्री कृष्ण मंगल कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आमदार राहुल कुल यांनी माहिती देताना, विविध चांगल्या योजना या सरकारच्या काळात आल्या, युद्ध सामग्री आयात करण्याऐवणी स्वदेशी साहित्य निर्मित देशात सुरू झाली. पीएम आवास योजना असो अथवा कोरोना काळात योग्य नियोजन करून लस तयार करण्याचे काम केल्याने देशाची मान उंचावली आहे त्यामुळे 2024 ला मोदी पंतप्रधान होतील अशी मानसिकता विरोधकांचीही झाली आहे त्यामुळे विरोधीपक्ष सुद्धा केंद्रासरकारच्या कामामुळे त्यांना नावे ठेवायला जागा मिळत नाही.
देशाची वाटचाल प्रगतीच्या दिशेने सुरू असल्याने देश प्रगतीच्या बाबतीत 11 व्या क्रमांकावरून 5 व्या स्थानावर आपण आलो आहोत. बाकीच्या देशांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. जलसंपदा विभाग खडकवासलाचे पाणी टनेल च्या माध्यमातून आणण्यासाठी 2 हजार कोटी होतोय आणि 14 हजार कोटींची जागा वापरण्यास मिळणार आहे. त्यामुळे अडीच ते तीन टी एम सी चे पाणी उपलब्ध होणार आहे. मुळशी धरणाचे पाणी आपल्या विभागात वळविण्यासाठीची प्रोसेस सुरू आहे. चिबड जमिन बाबत मी प्रयत्न करतोय त्यावर लवकरच नियोजन होईल. जनाई, शिरसाई योजना कार्यान्वित होऊन तालुक्यातील सर्व बंधारे भरण्याचा प्रयत्न राहील असे आमदार राहुल कुल यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी पुढे आ.कुल यांनी बोलताना, दौंड सुरू झालं की खराब रस्ते सुरू होतात अशी टीका व्हायची आता चांगले रस्ते सुरू झाले की दौंड सुरू झालं असं म्हटलं जातं. 1500 कोटींची तालुक्यातील रस्त्यांची कामे होणार आहेत. कासुर्डी ते पाटस असे 80 कोटीचे प्रस्ताव केंद्राकडे गेले आहे. त्यामुळे लवकरच तेही काम सुरू होईल. हडपसर ते उरुळी असा भारत माला हा रस्ता होणार आहे. तालुक्यात केडगाव-चौफुला-न्हावरा हा रस्त्याचे काम लवकरच सुरू होईल. तालुक्यात ग्रामिण रुग्णालय कामे प्रगती पथावर, दौंड बाह्यवळण काम लवकरच सुरू होत आहे. प्रांत कार्यालय महिना दीड महिन्यात सुरू होईल. दौंड, यवत पोलीस स्टेशन इमारती 70 ते 80 कोटींचा प्रस्ताव सादर केला असून लवकरच ते काम मार्गी लागणार आहे. मागासवर्गीय निवासी शाळा दौंडमध्ये सुरू होत आहे, 60 कोटींची दौंड शहराला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतोय, दौंडमध्ये रेस्ट हाऊस, यवत रेस्ट हाऊस चे काम मार्गी लागले आहे. सुभाष अण्णा कुल दूध संघाचे अमूल शी टाईप करण्यात आले आता दीड लाख लिटर दुध संकलन सुरू झाले आहे. भीमा सहकारी साखर कारखाना सुरू झालाय, मालकी सभासदांची आहे, हंगाम व्यवस्थित पार पडला. कारखाना योग्य दिशेने चालला आहे.
दौंड नगर परिषदेला विविध कामांसाठी पैसे उपलब्ध करून दिले. क्रीडा संकुल साठी जागा ताब्यात आला असून साडे आठ कोटी त्यासाठी फंड उपलब्ध होत आहे.
जलजीवन मिशन च्या माध्यमातून साडे चारशे कोटींची कामे तालुक्यात सुरू झालेली आहेत. पी एम आवास योजनेतून काही हजार कामे मार्गी लागत आहेत. मेंढपाळ योजनेसाठी प्रयत्न करतोय, कुरकुंभ मध्ये टेक्नॉलॉजी सेंटर होतेय. दूध दर 34 रुपये व्हावा ही मागणी होती ती पूर्ण होतेय, साखर दर निश्चित होणे गरजेचे होते त्यासाठी साखरेचा दर निश्चित केल्याने सर्वांना शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
अमित शहांनी 10 हजार कोटी रुपये तरतूद केल्याने त्याचा सर्वात मोठा फायदा हा शेतकऱ्यांनाच झाला आहे. कलम 370 रद्द करणे हा विषय त्यांनी व्यवस्थित मार्गी लावला. ग्रामिण भागाचा प्रतिनिधी म्हणून माझी आजही या भागासाठी काहीतरी नविन देण्याचा, मागण्याचा प्रयत्न सुरू आहे. केंद्रसरकारच्या विविध योजना या तालुक्यात आपण राबवत आहोत असे त्यांनी शेवटी सांगितले. या कार्यक्रमाला भीमा पाटस चे व्हाईस चेअरमन नामदेवनाना बारवकर, हरिश्चंद्र ठोंबरे, उमेश देवकर व तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.