‘दारुडा पोलिस’ ‘दारू पिऊन थेट ‘पोलीस चौकीत’ हजर, दौंडमधील धक्कादायक प्रकार

Crime News

दौंड : लोक दारू पिऊन येऊन गोंधळ घालतात त्यावेळी सुजाण नागरीक पोलिसांना बोलावून त्या दारुड्याला अद्दल घडवतात. मात्र पोलिसच जर दारू पिऊन कामावर येऊ लागले तर जनतेने दाद तरी कोणाकडे मागायची असा सवाल उपस्थित होतो. असाच एक प्रकार दौंडमध्ये घडला असून याबाबत दौंडच्या शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये याची मोठी चर्चा सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दि. 07 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास लिंगाळी (ता.दौंड) हद्दीमधील एस.आर.पी.एफ. ग्रुप नं. 7 येथे पोलीस नाईक संदीप नामदेव साबळे (पोना/919, वय-37 वर्षे रा.एस आर पी एफ ग्रुप नं-7, रुम नं-65/3 565 कॉटर्स दौंड) हे दारू पिऊन (मद्यपान करून) ड्युटीवर आले होते.
ते ड्युटीवर आल्यानंतर त्यांनी दारू पिल्याचे लक्षात आल्यानंतर सहा.पोलीस फौजदार शंकर रामचंद्र बसवंतकर (वय- 40, वर्षे भंदा नोकरी, रा बालाजीनगर दौंड) यांनी याबाबत दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी पोलीस नाईक संदीप नामदेव साबळे (पोना/919 वय-37 वर्षे रा-एस आर पी एफ ग्रुप नं-7 रुम नं-65/3 565 कॉटर्स दौंड ता- दौंड जि-पुणे) याच्यावर दौंड पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम- 85 (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसच कर्तव्यावर हजर असताना दारू पिऊ लागले तर मग नागरिकांनी कुणाच्या भरवश्यावर अवलंबून रहायचे असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.