पुणे : ‘१०० दिवसांची कार्यदक्षता सुधारणा विशेष मोहीम’ या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत, तालुका स्तरावरील उत्कृष्ट कार्यासाठी पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळविण्याचा मान पशुधन विकास अधिकारी- वर्ग 1, पशुवैद्यकीय चिकित्सालय केडगाव येथील डॉ. चैत्राली अशोक आव्हाड यांना प्राप्त झाला आहे.
त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य) तथा पालकमंत्री, पुणे जिल्हा यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात आले. महाराष्ट्र शासनामार्फत देण्यात आलेल्या या प्रशस्तिपत्रावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. डॉ. चैत्राली आव्हाड यांच्या कार्याचा यावेळी उपस्थितांनी गुणगौरव केला.
या कार्यक्रमाला डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (भा.प्र.से.) – विभागीय आयुक्त, पुणे विभाग, जितेंद्र डुडी (भा.प्र.से.) – जिल्हाधिकारी, पुणे, गजानन पाटील (भा.प्र.से.) – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे. चंद्रकांत वाघमारे – अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे. डॉ. समीर बोरकर, प्रादेशिक सह आयुक्त पशुसंवर्धन, पुणे विभाग. श्रीमती शालिनी कडू प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पुणे. श्रीकांत खारत – उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे. संजय नाईकवडे – शिक्षणाधिकारी (प्राथमिक) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.